Ankush Chaudhary Corona Positive : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड पाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण झाली आहे. 


अंकुश चौधरीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अंकुशने ट्वीट करत लिहिले आहे, "नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आली आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच. कोरोना वर मात करून पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी".






अंकुश लवकरच लकडाऊन सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकुशने मराठीतील अनेक दर्जेदार सिनेमांत काम केले आहे. 


बॉलिवूडला कोरोनाचा विळखा
अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल तसेच अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. एकता कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे, सध्या ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली असून आता त्याच्या मुलाला आणि पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगमलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. 


संबंधित बातम्या


83 Movie : 83 च्या विश्वचषकाने 'त्या' लहान मुलाला प्रेरणा मिळाली; सचिन तेंडुलकरने दिल्या जुन्या आठवणींना उजाळा, रणवीरचे केले कौतुक


Pushpa: The Rise : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित


Radhe Shyam Postponed : बॉलिवूड सिनेमांना कोरोनाचा फटका, प्रभासच्या 'राधे श्याम'ची रिलीज डेट ढकलली पुढे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha