Bollywood Movies Postponed : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनामुळे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे. आता बाहुबली स्टार प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) च्या 'राधे श्याम' (Radhe Shyam) सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 
राधे श्याम सिनेमा येत्या 14 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. सिनेमाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. 


वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. यात शाहिद कपूरचा 'जर्सी', एसएस राजामौली यांचा 'आरआरआर',  चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित 'पृथ्वीराज' सिनेमाचा समावेश आहे.





राधे श्यामच्या निर्मात्यांना  OTT रिलीजसाठी 400 कोटींची ऑफर! 
राधे श्यामच्या निर्मात्यांना ओटीटी रिलीजसाठी 400 कोटींची ऑफर मिळाली आहे. अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.


दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'राधे श्याम' सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. प्रभाससोबत पूजा हेडगेदेखील मुख्य भूमिकेत आहे. 'राधे श्याम' हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, मल्याळम सोबत हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रभासचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमारने केले आहे. 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : बिग बींच्या घरात कोरोनाचा शिरकाव; बंगल्यावर काम करणारा एक कर्मचारी कोरोनाबाधित


Sonu Nigam : प्रसिद्ध गायक सोनू निगमला कोरोनाची लागण; मुलगा आणि पत्नीही पॉझिटिव्ह


Sindhutai Sapkal : 'हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या...'; माईंसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha