83 Movie : कोरोनाकाळात अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कबीर खानचा '83' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. '83' सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. चांगली कथा, उत्तम कलाकार असूनदेखील हा सिनेमा फारशी कमाई करू शकला नाही. पण इंडस्ट्रीतील अनेक नामवंत व्यक्तींनी आणि समीक्षकांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे. 
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेदेखील सिनेमाचे कौतुक करत सिनेमातील त्याच्या पात्राची एक खास गोष्ट शेअर केली आहे. 


'83'सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर सचिनने सिनेमाचे कौतुक करत ट्वीट केले आहे की," '83' सिनेमात रणवीरने अष्टपैलू भूमिका साकारली आहे. हा सिनेमा आमच्या पहिल्या-वहिल्या विश्वचषक विजयाची आठवण करून देणारा आहे. या सिनेमाने माझ्यासारख्या लहान मुलाला प्रेरणा दिली आहे".






रणवीरच्या सिनेमात सचिन!
रणवीरच्या '83' सिनेमात एक लहान मुलगा 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयाचा आनंद लुटताना दिसत आहे. हा विश्वचषक सचिन तेंडुलकरला प्रेरणा देणारा ठरला होता. 


83 सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर सिनेमात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे. कपिल यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली आहे.


संबंधित बातम्या


Pushpa: The Rise : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित


Radhe Shyam Postponed : बॉलिवूड सिनेमांना कोरोनाचा फटका, प्रभासच्या 'राधे श्याम'ची रिलीज डेट ढकलली पुढे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha