Ranveer Singh Post Ka Postmortem : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या खास स्टाइलमुळे ओळखला जातो. नेहमीच तो त्याच्या लूकवर प्रयोग करत असतो. त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.पण रणवीर नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करत त्याच्या लूकवर प्रयोग करत राहतो. यामुळेच तो इतर कलाकारांपेक्षा वेगळा आहे. आता रणवीरचा एक लूक व्हायरल झाला आहे. त्याच्या या लूकवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Continues below advertisement

रणवीर सिंहने केसांत लाल रंगाची टोपी घातलेला फोटो शेअर केला आहे. रणवीरच्या या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. रणवीर दररोज सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असतो. त्यावर चाहते मजेशीर कमेंट्सदेखील करत असतात.

चाहत्यांनी केल्या मजेदार कमेंट्सरणवीरने निळ्या रंगाचा ट्रॅकसूट परिधान केलेला फोटो शेअर केला आहे. त्यावर त्याने गळ्यात सोन्याचा मोठा नेकपीस घातला असून हातात काळ्या रंगाची लेडीज पर्स पकडली आहे. या फोटोवर चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे,"भूत अंकल सिनेमातील जॅकी श्रॉफसारखा दिसतो आहेस". दुसऱ्या चाहत्याने कमेंट केली आहे, "शक्ती कपूरसोबत डेटवर जाण्याचा रणवीर विचार करतो आहे". 

चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने पुढे म्हटले आहे,"एक साधा टी-शर्ट किंवा शर्ट एकदा वापरून बघा. चांगले दिसाल". दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत विचारले आहे,"बॅग आणि विग दीपिकाचे चोरले आहेस का?" 

संबंधित बातम्या

Pushpa: The Rise : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

Kapil Sharma on Netflix : 'आय एम नॉट डन येट; कपिल शर्माच्या कॉमेडीची जादू आता लवकरच नेटफ्लिक्सवर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha