Cannes Film Festival 2024 : सध्या बॉलीवूडसह संपूर्ण जगभरात कान्स फिल्म फेस्टिवलची (Cannes Film Festival 2024) हवा आहे.  ऐश्वर्या राय, उर्वशी रौतेला, कियारा अडवाणी, आदिती राव हैदर यांसारख्या अनेक अभिनेत्री कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार आहेत. त्यातच आता एक मराठमोळी अभिनेत्री देखील कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे. अभिनेत्री छाया कदम यांना हा बहुमान मिळाला आहे. 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाचा प्रिमियर यंदाच्या कान्स सोहळ्यात होणार आहे. त्यानिमित्ताने छाया कदम (Chhaya Kadam) या कान्ससाठी रवाना झाल्या असून त्यांनी एअरपोर्टवरुन एक फोटो शेअर केला आहे. 


छाय कदम यांनी त्यांचा एअरपोर्टवरचा फोटो शेअर केला आहे. मराठमोळी अभिनेत्री कान्सच्या सोहळ्यात सहभागी होणार असल्याने, मराठी कलाविश्वातही अभिमानाचं वातावरण आहे. तसेच त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत शुभेच्छा देखील दिल्यात. पायल कपाडिया यांच्या सिनेमात छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याचसाठी त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण आलंय. त्यांच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावरही बरीच चर्चा असल्याचं पाहायला मिळतंय. 


'चलो कान्स' म्हणत शेअर केला फोटो


दरम्यान या अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला चलो कान्स असं कॅप्शन दिलं आहे. 77 व्या कान्स फिल्मफेस्टिवलमध्ये त्या सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली. यावेळी त्यांनी एक फोटो शेअर करत त्याला हटके असं कॅप्शन दिलं आहे. चलो कान्स असं कॅप्शन यावेळी छाया कदम यांनी त्यांच्या फोटोला दिलंय. त्यामुळे सध्या या अभिनेत्रीच्या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे. 


छाया कदम यांचे सिनेमे


छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याशिवाय छाया यांनी मराठी-हिंदीमध्ये  अनेक भूमिका साकारल्या आहेत.  'सैराट', 'फँड्री', 'सरला एक कोटी', 'न्यूड', 'हंपी' हे चित्रपटही विशेष गाजले.  






ही बातमी वाचा : 


chinmayee sumeet : IAS ऑफिसरची मुलगी अन् प्रशासकीय चौकटीतील जगणं, अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणाली, 'म्हणून फार कोणी जवळ यायचं नाही'