Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजआधीपासून हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी पार पडली. या पार्टीत अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. तर दुसरीकडे जावेद अख्तर (Javed Akhtar) या सिनेमाच्या यशाला 'खतरनाक' म्हणाले आहेत. 


'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या एक महिन्यानंतरही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे. नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी पार पडली. या पार्टीत बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलियाभट्टसह (Alia Bhatt) अनेक सेलिब्रिटी दिसून आले. 


'अॅनिमल'च्या सक्सेस पार्टीत सेलिब्रिटींची मांदियाळी (Animal Success Party Celebs Photo)


'अॅनिमल'च्या सक्सेस पार्टीत सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अनिल कपूर, प्रेम चोप्रा, नीतू कपूर, महेश भट्ट, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, रश्मिका मंदाना, संदीप रेड्डी वांगा, भूषण कुमार, तमन्ना भाटिया, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, राशा थडानी, रकुल प्रीत सिंहसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.






जावेद अख्तर यांची 'अॅनिमल'वर टीका


जावेद अख्तर 'अॅनिमल'बद्दल बोलताना म्हणाले की,"जर एखाद्या सिनेमात पती पत्नीच्या कानाखाली वाजवत असेल तिच्यासोबत गैरवर्तन करत असेल आणि तोच सिनेमा सुपरहिट होत असेल तर ही खतरनात बाब आहे".


जावेद अख्तर यांनी 'अॅनिमल' सिनेमावर टीका करणयासोबत त्यांतील गाण्यांवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,"आजकाल कशापद्धतीची गाणी येत आहेत?". चोली के पीछे क्या है या गाण्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सिनेमातील हे गाणं चांगलच हिट झालं आहे. कोट्यवधी लोकांना हे गाणं आवडलं आहे, ही गंभीर बाब आहे". 


'अॅनिमल' या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अनिल कपूर, तृप्ती डिमरी, बॉबी देओल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बॉबी देओल या सिनेमात नकारात्मक भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 550 कोटींची कमाई केली आहे.


संबंधित बातम्या


Ranbir Kapoor : 'अ‍ॅनिमल'नंतर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार रणबीर कपूर; वर्दीतला फोटो पाहिलात का?