Ajay Devgn Raid 2 Shooting Start : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करत अजयने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षकांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे.


अजय देवगनचा 'रेड' (Raid) हा सिनेमा 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 2024 मध्ये या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून रिलीज डेटदेखील समोर आली आहे. अजयचा 'रेड' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे चाहते गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाच्या सीक्वेलची प्रतीक्षा करत होते. 


'रेड 2'चं पोस्टर आऊट! (Raid 2 Poster Out)


निर्माता आणि दिग्दर्शक अभिषेक पाठकने 'रेड 2'चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये एका व्यक्तीचे पाय दिसून येत आहेत. 'रेड 2' साठी अयम पटनायक परतला आहे, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. 






'रेड 2' कधी रिलीज होणार? (Raid 2 Release Date)


अभिषेकने 'रेड 2'चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"आणखी एक केस सोडवण्यासाठी आयआरएस ऑफिसर अमय पटनायक परतला आहे. 15 नोव्हेंबर 2024 रोजी नाट्य आणि रहस्य पाहायला सज्ज व्हा". त्यामुळे 'रेड 2' हा सिनेमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार हे स्पष्ट होत आहे.


'रेड 2'च्या शूटिंगला सुरुवात (Raid 2 Shooting Start)


'रेड 2' या सिनेमाच्या शूटिंगला 6 जानेवारी 2024 रोजी सुरुवात झाली आहे. मुंबईतील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सिनेमाचं शूटिंग होणार आहे. राजकुमार गुप्ता या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. टी-सीरिज, मंगत पाठक आणि अभिषेक पाठक या सिनेमाची निर्मिती करत आहेत. 'रेड 2' या सिनेमासह 'सिंघम अगेन', 'औरें में कहां दम था' आणि 'मैदान' हे अजयचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 


संबंधित बातम्या


Singham 3 : 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात, अजय देवगनला दुखापत; सिनेमाचं शूटिंगही थांबलं