Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'अ‍ॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कमाई करत आहे. आक्रमक मुलाची भूमिका साकारल्यानंतर रणबीर आता पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहे.


रणबीरच्या 'अॅनिमल' या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. अशातच अभिनेत्याच्या नव्या प्रोजेक्टबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कॉप लूकमधील रणबीरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात तो सिंघम फेम दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत (Rohit Shetty) दिसत आहे. 


रणबीरचा वर्दीतला फोटो व्हायरल (Ranbir Kapoor Photo Viral)


रणबीर कपूरचा वर्दीतला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर एका फोटोत तो रोहित शेट्टीसोबत दिसून येत आहे. फोटोतील कॅप्शनमध्ये,"रणबीर कपूर आणि रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा? जेव्हा येईल तेव्हाच कळेल".






नेमकं प्रकरण काय? 


रणबीर आणि रोहित शेट्टीच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रणबीर आणि रोहितचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांचा कोणता सिनेमा रिलीज होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. पण खरंतर त्यांचा कोणताही सिनेमा रिलीज होणार नाही. रणबीर आणि रोहितचा फोटो एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचा आहे. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. रणबीरचा कॉप अवतार पाहून चाहते चाहते खूश झाले आहेत. 


रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. गदर 2 आणि टायगर 3 सारख्या बिग बजेट सिनेमांचा रेकॉर्डही या सिनेमाने ब्रेक केला. आता अॅनिमलच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.


रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'साँवरीया' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'वेक अप सिड', 'अजब प्रेम की गजब कहाणी' हे त्याचे सिनेमे चांगलेच गाजले. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. आलिया-रणबीर पुन्हा एकत्र कधी दिसणार याचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


Animal OTT Release : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रणबीरचा 'अ‍ॅनिमल' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल