Animal Ticket Price: अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir kapoor) 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट  रिलीज होऊन महिना उलटला तरी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ दिसत आहे. अशातच 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी चित्रपटाच्या तिकीट दरावर खास ऑफर ठेवली आहे.  ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा तिकिट दर  कमी करण्यात आला आहे. रणबीर कपूरचा हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये 100 रुपयात बघता येणार आहे. 100 रुपयात अ‍ॅनिमल चित्रपट पाहण्यासाठी कसं तिकीट बुक करावं लागेल? याबाबत जाणून घेऊयात...


अॅनिमल चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 300-400 रुपयांवरून आता  100 रुपये केली आहे. फक्त 100 रुपयांमध्ये तुम्ही आता थिएटरमध्ये रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट बघता येणार आहे. 


असं बुक करा तिकीट


अॅनिमल चित्रपटाच्या मेकर्सनं ट्विटरवर  100 रुपयांमध्ये  अॅनिमल या चित्रपटाचे तिकीट कसे मिळवायचे? याची माहिती शेअर केली आहे. अॅनिमल चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आता फक्त 100 रुपयांमध्ये तुमचा आवडता ब्लॉकबस्टर पहा." या ट्वीटमध्ये तिकिट बुक करण्याची लिंक देखील दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला paytm आणि बुक माय शो हे दोन ऑप्शन दिसतील. यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करुन तुम्ही अॅनिमल चित्रपटाचं तिकीट खरेदी करु शकता. ही ऑफर सिलेक्टेड थिएटर्समध्ये उपलब्ध आहे.






'अॅनिमल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ


रणबीरचा अॅनिमल हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन 40 दिवस झाले आहेत 'अॅनिमल' या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 550.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात रणबीर शिवाय रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. या चित्रपटातील डायलॉग्सनं आणि अॅक्शन सीन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अॅनिमल या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच अॅनिमल पार्क या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या:


Javed Akhtar : अॅनिमलमधील संवादावरुन जावेद अख्तर आणि निर्मात्यांमध्ये वाद चिघळला; निर्माते चांगलेच भडकले