Javed Akhtar : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. जावेद अख्तर त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एका वादात अडकले आहेत. नुकताच अंजठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. या महोत्सवात जावेद अख्तरही सहभागी झाले होते. या यावेळी त्यांनी बॉलिवूडच्या (Bollywood) अॅनिमल (Animal Movie) या सिनेमाबाबत मत व्यक्त केलं होतं. दरम्यान, बाबत जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी नोंदवलेल्या मतानंतर अॅनिमलचे निर्माते चांगलेच भडकले आहेत. 


जावेद अख्तर यांच्या विधानानंतर वाद सुरुच  ( Javed Akhtar and  Animal Movie)


लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अॅनिमलमधील (Animal Movie) एका सीनबाबत मत नोंदवले होते. याबाबत बोलताना अख्तर म्हणाले, सध्याच्या घडीला सिनेमा बनवणाऱ्या लोकांपेक्षा सिनेमा पाहणाऱ्या लोकांवर जास्त जबाबदारी आहे. कारण जर एखाद्या सिनेमामध्ये जर हिरोने एखाद्या महिलेला बूट चाटण्यासाठी सांगितले तर तो सिनेमा सुपरहिट होत आहे. हा मोठ्या चिंतेचा विषय आहे. 


अॅनिमलचे निर्माते चांगलेच भडकले ( Javed Akhtar and  Animal Movie)


जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या वक्तव्याबाबत अॅनिमलच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन प्रतिक्रिया दिली आहे. अॅनिमलचे निर्माते (Animal Movie) म्हणाले, "माझे बुट चाटा" हा संवाद जर सिनेमामध्ये महिलेच्या तोंडून आला असता तर तो स्त्रीवादासाठी आधार बनला असता. निर्मात्यांनी एका ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले की, "तुमच्यासारखा लेखक एखाद्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या झालेल्या विश्वासघाताला समजू शकणार नाही. जर एखाद्या महिलेचा प्रेमात विश्वासघात झाला असता आणि तिने बुट चाटण्यास सांगितले असते तर तुम्ही त्याला स्त्रीवादाचा आधार बनवले असते." 


प्रेमाला राजकारणापासून दूर ठेवा ( Javed Akhtar and  Animal Movie)


निर्माते पुढे बोलताना म्हणाले, "प्रेमाला स्त्री आणि पुरुष यांच्यातील राजकारणापासून दूर ठेवा. त्यांना आपण फक्त प्रेमी म्हणू शकतो." अॅनिमल या सिनेमात तृप्ती डिमरी रणबीर कपूरचा प्रेमात विश्वासघात करते. त्यानंतर तो तिला बुट चाटण्यासाठी सांगतो. तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या सीनबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा आहेत. डिमरीच्या बोल्ड सीनमुळे आणि सिनेमात दाखवण्यात आलेल्या अतोनात हिंसाचारामुळे प्रेक्षकांचा सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळालाय. 


 






इतर महत्वाच्या बातम्या 


Telly Masala : अभिनेते किरण माने यांची राजकारणात एन्ट्री ते सलमानचा 'टायगर 3' ओटीटीवर रिलीज; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या