Upcoming Bollywood Movies Release 2024 : हिंदी मनोरंजनसृष्टीसाठी (Bollywood) हे वर्ष खूपच खास आहे. 2024 मध्ये अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रदर्शित होणार आहेत. या बहुप्रतीक्षित सिनेमांची सिनेप्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. 'फायटर' ते 'मै अटल हूँ' असे विविध विषयांवर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे 2024 मध्ये रिलीज होणार आहेत.
1. फायटर (Fighter)
'फायटर' या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
2. पुष्पा 2
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
3. वेलकम टू द जंगल
'वेलकम टू द जंगल' या सिनेमात अक्षय कुमार, अरशद वारसी आणि संजय दत्त हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 2024 मध्येच हा सिनेमा रिलीज होणार आहे.
4. सिंघम अगेन
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
5. कल्कि 2898 एडी
'कल्कि 2898 एडी' या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन सी.आसवानी यांनी केलं आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पादुकोण, दिशा पटानी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
6. लव सेक्स और धोखा 2
एकता कपूरचा 'लव सेक्स और धोखा 2' हा सिनेमा 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिबाकर बनर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
7. हनुमान
दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जाचा आगामी हनुमान हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
8. बडे मियाँ छोटे मियाँ
'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. ईद 2024 मध्ये हा सिनेमा रिलीज होईल. टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.
9. कांगुवा
सिरुथाई सिवा दिग्दर्शित कांगुवा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात 9 व्या शतकापासून 21 व्या शतकापर्यंतची कथा दाखवण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे.
10. देवरा
ज्युनियर एनटीआरचा 'देवरा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.
11. स्त्री 2
स्त्री 2 हा सिनेमा ऑगस्ट 2024 मध्ये प्रदर्शित होईल.
12. मेरी ख्रिसमस
मेरी ख्रिसमस या बहुचर्चित सिनेमाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
13. कॅप्टन मिलर
कॅप्टन मिलर या सिनेमात धनुष मुख्य भूमिकेत आहे. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
14. इंडियन 2
इंडियन 2 या सिनेमात कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या वृद्ध स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका त्यांनी साकारली आहे.
15. योद्धा
योद्धा या अॅक्शन थ्रिलर सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 15 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.
17. मै अटल हूँ
मैं अटल हूँ हा रवी जाधव दिग्दर्शित आणि ऋषी विरमानु लिखित आगामी सिनेमा आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.
18. जिगरा
जिगरा या सिनेमाचं दिग्दर्शन वासन बालाने केलं आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होईल. आलिया भट्ट या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
19. प्रोजेक्ट के
प्रोजेक्ट के हा सिनेमा जानेवारी 2024 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाग अश्विनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
20. भूल भुलैया 3
'भूल भुलैया 2'च्या यशानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत 'भूल भुलैया 3'ची घोषणा केली होती. 2024 च्या दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
21. स्काय फोर्स
अक्षय कुमारचा 'स्काई फोर्स' (Sky Force) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या पहिल्या हवाई युद्धावर आधारित हा सिनेमा आहे.
22. रेड 2
अजय देवगनचा 'रेड 2' हा सिनेमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. पुन्हा एकदा अमय पटनायकला पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
23. चंदू चँपियन
चंदू चँपियन हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. कार्तिक आर्यन या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 14 जून 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.
24. मिस्टर अॅन्ड मिसेज माही
राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा आहे. 15 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संबंधित बातम्या