Animal Movie: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) अॅनिमल (Animal) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. पण या चित्रपटामधील काही डायलॉग्सला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अॅनिमल चित्रपटामधील रणबीरच्या 'लीक माय शू' या डायलॉगनं देखील अनेकांचे लक्ष वेधले. अशतच आता या डायलॉगवर 'अॅनिमल' चित्रपटामधील अभिनेत्री तृप्ती डिमरीनं (Tripti Dimri) मौन सोडलं आहे.


'अॅनिमल' मधील या सीननं वेधलं लक्ष 


अ‍ॅनिमल चित्रपटाच्या एका सीनमध्ये दाखवण्यात आलं आहे की, रणबीर कपूरचे पात्र तृप्तीला तिचे त्याच्यावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी  त्याचे बूट चाटण्यास सांगते. तो तिला 'लीक माय शू' असं म्हणतो. अॅनिमल चित्रपटातील अनेक सीनपैकी हा एक सीन आहे, ज्याच्यावर सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली. याबाबत एका मुलाखतीमध्ये तृप्तीनं सांगितलं आहे.


अॅनिमलमधील सीनबाबत तृप्ती म्हणाली,  "माझ्या अभिनय प्रशिक्षकाने मला एक गोल्डन रुल सांगितला होता. ते म्हणाले होते की, कधीही तुमच्या व्यक्तिरेखेला जज करू नका. तुम्ही जी व्यक्तीरेखा साकारत आहात किंवा तुमचा सह-अभिनेता जी व्यक्तिरेखा साकारत आहे, त्याला जज करुन नका, ती एक व्यक्ती असते आणि प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट बाजू असतात. एखाद्या अभिनेत्याने चांगले, वाईट  अशा विविध भूमिका साकारण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. परंतु जर आपण एखाद्या पात्राच्या प्रेरणा, विचारांना जज  केलं तर आपण ते प्रामाणिकपणे साकारू शकणार नाही. म्हणून मी तेच लक्षात ठेवल."


तृप्ती म्हणाली, "मला असे सांगितले तर मी त्या व्यक्तीला मारेन!"


'लीक माय शू'  या डायलॉगबाबत तृप्ती म्हणाली, “खऱ्या आयुष्यात जर कोणी मला असे सांगितले तर मी कदाचित त्या व्यक्तीला मारेन! पण चित्रपटात तो तिला तसे करण्यास सांगतो. (त्याचे बूट चाटायला सांगतो) पण नंतर तसं सांगून तो निघून जातो. त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरु असतात. माझं पुढे काय करायचं? असा प्रश्न जेव्हा त्याचे चुलत भाऊ विचारतात तेव्हा तो त्यांना म्हणतो,'तिला जिथे पाहिजे तिथे जाऊ द्या.'


संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga)   यांनी अॅनिमल या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.


संबंधित बातम्या:


Ranbir Kapoor And Tripti Dimri: "अॅनिमल" मधील तृप्ती डिमरीच्या बोल्डनेसची चर्चा; रणबीरसोबतचा बेडरुम सीन व्हायरल, नेटकरी म्हणाले....