Khurchi Teaser Out: जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची (Khurchi) हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) आणि अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 


'खुर्ची'चा टीझर रिलीज (Khurchi Teaser Out)


खुर्ची या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे हा एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. "जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला, तिथूनच एका नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी..." या डायलॉगनं खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमधील अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


पाहा टीझर






राकेश बापटनं खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया शेअर केला आहे. टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "तो आलाय सत्तेसाठी, 'खुर्ची'साठी आणि अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी...आता सुरु झालंय 'खुर्ची'चं महायुद्ध!" अनेकांनी खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट  राकेशला या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


कधी रिलीज होणार चित्रपट? (Khurchi Release Date)


 ‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.‘खुर्ची’साठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘खुर्ची’ या चित्रपटाचे दिग्दर्शन  शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलं आहे.


चित्रपटामधील गाण्यांना प्रशांत मडपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिली असून, त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिले आहे.आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आर्यन यांनी आपल्या सुमुधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणी गायली आहेत. 






इतर महत्वाच्या बातम्या:


Khurchi Motion Poster Out: "सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच!"; 'खुर्ची' चं मोशन पोस्टर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला