Fighter Teaser Release Date Aanounced: अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan ) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' (Fighter) या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.  या चित्रपटामधील हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांचा लूक काही दिवसांपूर्वी रिव्हिल करण्यात आला आहे. आता या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.


कधी रिलीज होणार 'फायटर' चा टीझर?


हृतिक रोशननं एक व्हिडीओ शेअर करुन फायटर चित्रपटाच्या टीझरच्या रिलीजची तारिख जाहीर केली आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, "लॉक्ड,लोडेड, रेडी टू ड्रॉप, फायटर फिवर"  उद्या (शुक्रवार, 8 डिसेंबर)  सकाळी 11 वाजता फायटर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.






कलाकारांची भूमिका


'फायटर' या  चित्रपटामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे. तर दीपिका ही या चित्रपटात स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड ही भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील कॅप्टन जय सिंह उर्फ रॉकी ही भूमिका अनिल कपूर हे साकारणार आहेत.


फायटर चित्रपटाची रिलीज डेट (Fighter Release Date)


फायटर हा चित्रपट  25 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक  आणि दीपिका हे पहिल्यांदाच  स्क्रिन शेअर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी फायटर या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.  आता प्रेक्षक या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकतेने वाट बघत आहेत.






सिद्धार्थ आनंद यांनी फायटर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.सिद्धार्थ यांचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट असणार आहे.याआधी दोघांनी 'वॉर', 'बँग बँग' या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. 'वॉर', 'बँग बँग' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता फायटर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या: