Animal Box Office Collection : रणबीरच्या 'अॅनिमल'ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस! देशात 300 तर जगभरात 500 कोटींचा टप्पा पार; जाणून घ्या आठ दिवसांचं कलेक्शन
Animal Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे.
Animal Box Office Collection Day 8 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा चांगलीच कमाई करत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात जात आहेत. दिवसेंदिवस या सिनेमाबद्दलची क्रेझ वाढत चालली आहे. रिलीजच्या आठ दिवसांत या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
'अॅनिमल' या सिनेमात प्रेक्षकांना नाट्य, भावना, वॉयलेंस ते इंटीमेसी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. सिनेमातील या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'अॅनिमल' या सिनेमाच्या माध्यमातून रणबीरने त्याची इमेज ब्रेक केली आहे. रोमँटिक हिरो असलेल्या रणबीरचा अॅक्शन मोड प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Animal Box Office Collection Day 8)
'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी, पाचव्या दिवशी 37.47 कोटी, सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24.23 कोटी आणि आठव्या दिवशी 23.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या आठ दिवसांत 'अॅनिमल'ने 361.08 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस : 63.8 कोटी
- दुसरा दिवस : 66.27 कोटी
- तिसरा दिवस : 71.46 कोटी
- चौथा दिवस : 43.96 कोटी
- पाचवा दिवस : 37.47 कोटी
- सहावा दिवस : 30.39 कोटी
- सातवा दिवस : 24.23 कोटी
- आठवा दिवस : 23.50 कोटी
- एकूण कमाई : 361.08 कोटी
'अॅनिमल'ने रिलीजच्या आठ दिवसांत शानदान कमाई केली आहे. 2023 मधील ब्लॉकबस्टर सिनेमांत या सिनेमाचा समावेश झाला आहे. 'अॅनिमल'ने रिलीजच्या आठ दिवसांत अनेक सिनेमांचं कलेक्शन ब्रेक केलं आहे. यात गदर 2, जवान, बाहुबली 2, दंगल आणि पठाण या सिनेमांचा समावेश आहे.
'अॅनिमल' या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर, प्रेम चोप्रा, शक्ति कपूर हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील सर्वचं कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. सिनेमागृहातील सर्वच शोला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'अॅनिमल'ने रिलीजच्या सहा दिवसांतच 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा छप्परफाड कमाई करत आहे.
संबंधित बातम्या