Animal Box Office Collection Day 3 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) बहुचर्चित 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. रिलीजच्या तीन दिवसांतच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.


'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Animal Box Office Collection)


'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 72.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 202.57 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर भारतात तीन दिवसांत या सिनेमाने 236 कोटींची कमाई केली आहे. 


'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी सांभाळली आहे. वडील-मुलाच्या नात्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. सिनेमात अनिल कपूर यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदानासोबतची रणबीरची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. बॉबी देओलनेही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. 'अॅनिमल' हा रणबीरच्या करिअरमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे.


जगभरातील बॉक्स ऑफिसवर सध्या रणबीरच्या 'अॅनिमल'चा बोलबाला आहे. रणबीरच्या या सिनेमाने चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. रणबीरचे गेल्या काही दिवसांत अनेक सिनेमे फ्लॉप ठरले असले तरी त्याचा 'अॅनिमल' हा सिनेमा मात्र प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात यशस्वी ठरला आहे. या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 


'अॅनिमल' लवकरच पार करणार 300 कोटींचा टप्पा


मीडिया रिपोर्टनुसार, 'अॅनिमल' या सिनेमाची निर्मिती 100 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. 'अॅनिमल' लवकरच जगभरात 300 कोटींचा टप्पा पार करण्यास सज्ज आहे. या सिनेमातील रणबीरचा अॅक्शन मोड चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमागृह गाजवल्यानंतर हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


'अॅनिमल'ने तोडला 'पठाण', 'टायगर 3'चा रेकॉर्ड


'अॅनिमल' या बहुचर्चित सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे. बॉक्स ऑफिसचा बादशाह शाहरुख खान असल्याचं म्हटलं जातं. पण रणबीरच्या 'अॅनिमल'ने पठाणचाही रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 


जवान - 200 कोटींचा टप्पा पार करण्यात लागले 3 दिवस
अॅनिमल - 200 कोटींचा टप्पा पार करण्यात लागले 3 दिवस
पठाण - 200 कोटींचा टप्पा पार करण्यात लागले 4 दिवस
टायगर 3 - 200 कोटींचा टप्पा पार करण्यात लागले 6 दिवस


संबंधित बातम्या


Animal Cast Fees: 'अॅनिमल'साठी रणबीरनं घेतलंय तगडं मानधन; जाणून घ्या रश्मिका अन् बॉबी देओलसह इतर कलाकारांची फी...