Mudassar Khan:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खानचा (Mudassar Khan) निकाह संपन्न झाला आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुदस्सर खाननं रिया किशनचंदानीसोबत (Riya Kishanchandani) लग्न केलं आहे. रिया आणि मुदस्सर यांच्या निकाह सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनला सलमान खाननं (Salman Khan) हजेरी लावली.


कोण आहे रिया किशनचंदानी?


मुदस्सरची पत्नी रिया ही 'स्प्लिट्सविला' आणि 'मिका दी वोटी' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. रिया  ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 'मैं होना की नहीं होना', 'स्वॅग दी सवारी' आणि 'तेनू दस्या' यांसारख्या सिनेमांमध्येही तिनं काम केलं. 


मुदस्सरनं 'या' चित्रपटांमधील गाण्यांची केली कोरिओग्राफी


मुदस्सर खाननं 'दबंग', 'बॉडीगॉर्ड' आणि 'रेड्डी' या चित्रपटांमधील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. या चित्रपटांमध्ये सलमान खाननं काम केलं आहे. सलमान खाननं मुदस्सरच्या रिसेप्शन कार्यक्रमाला हजेरी लावली. मुदस्सर आणि रियाच्या रिसेप्शनमध्ये सलमानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये सलमान हा कॅज्युअल लूकमध्ये दिसला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान हा मुदस्सरला मिठी मारुन त्याला शुभेच्छा देतो.






मुदस्सरनं त्याच्या निकाह सोहळ्याचे  काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो व्हाईट कलरचं आऊटफिट आणि ब्लॅक गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे.  या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "जगातील सर्वात सुंदर व्यक्तीसोबत मी लग्न केलं आहे. आमच्या सर्व मित्र आणि प्रियजनांच्या प्रेमाबद्दल  आभार मानतो."






रियानं देखील निकाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये रिया ही व्हाईट कलरचा ड्रेस आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे.






संंबंधित बातम्या:


Shah Rukh Khan: 'या' पाच कलाकारांनी 'या' चित्रपटांना दिला नकार अन् पश्चातापाची वेळ आली; चित्रपटाने जिंकले होते 5 राष्ट्रीय पुरस्कार