Animal Cast Fees: सध्या सगळीकडे   'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाची सॅम बहादुर (Sam Bahadur) या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. 1 डिसेंबर रोजी अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अशातच अॅनिमल या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अॅनिमल या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयायत या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबद्दल...


रणबीरनं घेतलंय तगडं मानधन


पिंकवीलाच्या रिपोर्टनुसार, रणबीरनं अॅनिमल या चित्रपटासाठी 30 - 35 कोटींचे मानधन घेतलं आहे. तसेच   अभिनेता बॉबी देओलनं या चित्रपटासाठी . 4-5  कोटींची फी घेतली आहे.रश्मिका मंदानानं अॅनिमल चित्रपटासाठी चार कोटींचे मानधन घेतलं आहे तर चित्रपटात रणबीरची भूमिका साकारणाऱ्या अनिल कपूर यांनी या चित्रपटासाठी 2  कोटी फी घेतली आहे.


सेन्सॉर बोर्डानं अॅनिमल या चित्रपटाला A सर्टिफिकेट दिलं आहे. हा चित्रपट  3 तास 21 मिनिटांचा आहे. चित्रटात अभिनेत्री तृप्ती डिमरीनं देखील महत्वाची भूमिका साकारली आहेत.  


'अॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वडील आणि मुलगा यांच्यातील गुंतागुंतीचे नाते दाखवण्यात आले आहे. अनिल कपूर  यांनी कथेत रणबीरचे वडील बलबीर सिंह यांची भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदान्ना ही चित्रपटात गीतांजलीच्या भूमिकेत आहे.






'अॅनिमल' या चित्रपटाचं दिग्दर्शनसंदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga)  यांनी केलं आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी दिवशी 'अॅनिमल' चित्रपटानं 63.8 कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 66 कोटींची कमाई केली आहे.  'अ‍ॅनिमल' या चित्रपटानं  33.97 कोटी रुपयांच्या  अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनसह पठाण (31.26 कोटी), टायगर 3 (22.48 कोटी) आणि गदर 2 (17.60 कोटी)चे रेकॉर्ड मोडले आहेत.


'अॅनिमल' मधील गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती


'अॅनिमल' या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटामधील अर्जन व्हेली आणि सतरंगा या दोन्हीही गाण्यांचे अनेक जण कौतुक करत आहेत.


संबंधित बातम्या:


Ranbir Kapoor And Tripti Dimri: "अॅनिमल" मधील तृप्ती डिमरीच्या बोल्डनेसची चर्चा; रणबीरसोबतचा बेडरुम सीन व्हायरल, नेटकरी म्हणाले....