Animal Movie : रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा फिव्हर चाहत्यांमध्ये जोरात सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहते संदीप रेड्डी वंगा यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. पण त्या आधी या चित्रपटातील कलाकार अनिल कपूर (Anil Kapoor) आणि बॉबी देओलच्या (Bobby Deol)  एका फोटोवरून जोरदार चर्चा सुरू आहे. 


66 वर्षीय अनिल कपूरची 54 वर्षीय बॉबी देओलला टक्कर (Anil Kapoor Bobby Deol Viral Photo) 


चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी अनिल कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. अनिल कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बॉबी देओलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये  दोघेही त्यांचे एब्स फ्लाँट करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना अनिल कपूरने लिहलंय की, 'अॅनिमल का बाप और अॅनिमल का एनिमी पोजिंग'


 






अनिल कपूरने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'पांच रुपये की पेपसी, दोनों भाई सेक्सी.'


एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, 'बाप बाप होता है...' एका यूजरने लिहिलंय की, 'अॅनिमल का बाप बहुत स्टॉन्ग लग रहा है.'


अॅडव्हान्स बुकिंगमध्ये धमाका 


रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना दिसणार आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने धमाकेदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल दोन लाख तिकीट विकले गेले आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेतील तिकीट विकले गेले आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने 6.4 कोटींची कमाई केली आहे. 


हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'हुआ मैं' आणि 'अर्जन वेली' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.



ही बातमी वाचा: