Kho Gaye Hum Kahan: अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अभिनेता आदर्श गौरव (Adarsh Gourav) यांचा खो 'खो गए हम कहां' (Kho Gaye Hum Kahan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'खो गए हम कहां' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


इमाद, अहाना आणि नील या तिघांची गोष्ट 'खो गए हम कहां' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्जुन वरैन सिंह यांनी केलं आहे. रितेश सिधवानी, फरहान अख्तर, रीमा कागती, झोया अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. झोया अख्तर, अर्जुन वरैन सिंग, रीमा कागती यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.


कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार चित्रपट? (Kho Gaye Hum Kahan On OTT)


'खो गए हम कहां'  हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. हा चित्रपट 26 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'खो गए हम कहां' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अनन्या पांडे, आदर्श गौरव आणि सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं,"चांगल्या गोष्टी खरोखरच तीन असतात आणि त्या Netflix वर येत आहेत! खो गए हम कहां 26 डिसेंबरला येत आहे!"






'खो गए हम कहां' ची स्टार कास्ट (Kho Gaye Hum Kahan cast)


'खो गए हम कहां'  या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीनं या चित्रपटात  इमाद  ही भूमिका साकारली आहे. तर अहाना ही भूमिका  अनन्या पांडेनं साकारली आहे. तसेच नील ही भूमिका आदर्श गौरवनं साकारली आहे.


संबंधित बातम्या:


OTT Release This Week: 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज