Ranbir Kapoor Animal Advance Booking Day 1 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. संदीप रेड्डी वांगाने (Sandeep Reddy Vanga) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'अॅनिमल'ने रिलीजआधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे.
रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज असून या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने धमाकेदार कामगिरी केली आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा 'अॅनिमल' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच ओपनिंग करणार आहे.
'अॅनिमल' या सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल दोन लाख तिकीट विकले गेले आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेतील तिकीट विकले गेले आहेत. 'अॅनिमल' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 6.4 कोटींची कमाई केली आहे.
'अॅनिमल'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या...
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अनिल कपूरही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉबी देओल या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
'अॅनिमल' हा सिनेमा आधी 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'हुआ मैं' आणि 'अर्जन वेली' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. चाहते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'अॅनिमल' हा बिग बजेट सिनेमा आहे.
संबंधित बातम्या