Animal Trailer: संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर 'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.  या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या ट्रेलरची रणबीरचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या मेकर्सनं अखेर या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


कधी रिलीज होणार 'अॅनिमल' चा ट्रेलर? (Animal Trailer)


संदीप रेड्डी वंगा यांनी  इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करुन 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीज जाहीर केली आहे.संदीप यांनी रणबीर कपूरसोबतचा  एक फोटो शेअर केला आहे.  या फोटोवर "23 नोव्हेंबरला ट्रेलर."  असं लिहिलेलं दिसत आहे.






 बुर्ज खलिफावर झळकला टीझर


दुबईतील बुर्ज खलिफा येथे 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा टीझर दाखवण्यात आला.बुर्ज खलिफावर अॅनिमल चित्रपटाचा टीझर पाहण्यासाठी रणबीर कपूर आणि बॉबी देओल हे दुबईमध्ये पोहोचले होते.   'अॅनिमल' चित्रपटाचा टीझर बुर्ज खलिफावर पाहून रणबीर आणि बॉबी आश्चर्यचकित झाले. 






कधी रिलीज होणार चित्रपट? (Animal Release Date)


अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट आधी 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता पण  काही कारणांमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती (Animal Movie Songs)


'हुआ मैं' आणि  'अर्जन वेली' ही अॅनिमल या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या दोन्हीही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मनन भारद्वाज आणि भूपिंदर बब्बल यांनी 'अर्जन वेली' हे गाणं गायलं आहे. या गाण्यात रणबीरचा हटके अंदाज बघायला मिळतो.


इतर महत्वाच्या बातम्या:


Animal Song Arjan Vailly Out: रक्ताने माखलेला रणबीर अन् जबरदस्त अॅक्शन सीन्स; 'अॅनिमल' मधील 'अर्जन वेली' गाणं रिलीज