एक्स्प्लोर
अर्जुन कपूरच्या ट्वीटला काका अनिल कपूरचं 'झक्कास' उत्तर
अभिनेते अनिल कपूर आणि त्यांचा पुतण्या अभिनेता अर्जुन कपूर यांच्यातील नातं अत्यंत मैत्रीपूर्ण आहे. हेच आता अर्जुन कपूर आणि अनिल कपूर यांच्या ट्वीट आणि रिप्लायवरुन पुन्हा समोर आले आहे.
मुंबई : अभिनेते अनिल कपूर आणि त्यांचा पुतण्या अभिनेता अर्जुन कपूर यांच्यातील नातं अत्यंत मैत्रीपूर्ण आहे. हेच आता अर्जुन कपूर आणि अनिल कपूर यांच्या ट्वीट आणि रिप्लायवरुन पुन्हा समोर आले आहे. त्याचे झाले असे की, अर्जुन कपूरने एक फॅमिली फोटो पोस्ट केला आणि त्याला दिलेल्या कॅप्शनला अनिल कपूर यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये 'झक्कास' उत्तर दिले.
अर्जुन कपूरने काय ट्वीट केलं?
अभिनेता अर्जुन कपूरने फॅमिली फोटो ट्विटरवर शेअर केला. त्यामध्ये अनिल कपूर, संजय कपूर, बोनी कपूर, हर्षवर्धन कपूर, अर्जुन कपूर, श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली यांसह अर्जुन कपूरची भावंडं आहेत. या फोटोत केवळ अनिल कपूर यांनी गॉगल घातला आहे. हाच धागा पकडत अर्जुन कपूर यांनी म्हटलंय की, "आम्हाला कुणालाच माहित नाहीय की, अनिल कपूर यांनी फॅमिली फोटोत सनग्लासेस का घातले आहे. कदाचित त्यांना असे सांगायचे असेल की, आम्ही सगळे त्यांचे चाहते आहोत."
अर्जुन कपूर याच्या ट्वीटला अभिनेते अनिल कपूर यांनीही अगदी दिलखुलासपणे रिप्लाय दिला. आपल्या खास 'झक्कास' स्टाईलमध्ये अनिल कपूर यांनी अर्जुनचं ट्वीट कोट-रिट्वीट करत म्हटले, "बिकॉज, मेनू काला चश्मा जज्दा है, चाचू!" रक्षाबंधनानिमित्त कपूर फॅमिली एकत्र जमली होती. अर्जुन कपूर, हर्षवर्धन कपूर यांची सगळी भावंडं एकत्र होतीच, सोबत अनिल कपूर, संजय कपूर आणि बोनी कपूरही हजर होते.Because Mainu Kala Chashma jajda hai, Chachu! ????????????????@arjunk26 https://t.co/5Hl9o3w9GY
— Anil Kapoor (@AnilKapoor) August 26, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement