Kangna ranaut : तबलिगी जमातीबाबत वादग्रस्त ट्विट केल्याविरोधात अभिनेत्री कंगना रनौतविरोधात दाखल केलेली फौजदारी फिर्याद अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं फेटाळली लावली आहे. त्यामुळे कंगना आणि तिची बहिणी रंगोली चंडेल हिलाही दिलासा मिळाला आहे. या निकालाला तक्रारदार अैड. काशिफ अली खान देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिलं असून लवकरच यावर सुनावणी अपेक्षित आहे.
कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात दंडाधिकारी न्यायालयात यासंदर्भात फौजदारी तक्रार दाखल केली होती. मागील वर्षी एप्रिल महिन्यात रंगोली चंडेलनं तिच्या ट्विटर हँडलवर तबलिगी जमातीबद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. या पोस्टला कंगनानंही समर्थन दिलं होतं. मात्र या पोस्टमुळे धार्मिक समुदायांमध्ये तेढ निर्माण होत आहे आणि देशाच्या एकात्मिक भावनेला छेद पोहचत आहे असा आरोप अली काशिफ खान देशमुख यांनी केला होता. न्यायालयानं याची दखल घेत आंबोली पोलीस ठाण्याला याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी याबाबत नुकताच आपला तपास अहवाल सादर केला. त्यानुसार दंडाधिकारी न्यायाधीश भागवत झिरापे यांनी आपला निकाल जाहीर केला. आयपीसी कलम 153 (अ), 153 (ब), 295 (अ) आणि कलम 505 नुसार कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हा दंडाधिकारींंची परवानगी आवश्यक आहे. या समंती शिवाय खटल्याची कारवाई सुरू होऊ शकत नाही, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं आहे.त्यामुळे न्यायालय याबाबत कारवाई करु शकत नाही. या प्रकरणात अशी परवानगी तक्रारदारानं सादर केलेली नाही, त्यामुळे या तक्रारीत तथ्य नाही असं मत न्यायालयानं व्यक्त केलं.
कलम 153 हे समजात तेढ निर्माण करणं यासाठी, 153 हे राष्ट्रीय भावना भडकावणं यासाठी तर, 295 म्हणजे जाणीवपूर्वक विधान करणं यासाठी आहे. त्यामुळे कंगना आणि तिची बहीण जाणीवपूर्वक प्रक्षोभक ट्विट करून सामाजिक शांतता बिघडवतात असा आरोप देशमुख यांनी कोर्टात केला होता.
महत्तवाच्या बातम्या
Farmers Protest : शेतकऱ्यांची 28 तारखेला मुंबईत महापंचायत तर 29 तारखेला संसदेला घेराव, आंदोलनाला एक वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नियोजन
लस न घेणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल आणि गॅस मिळणार नाही, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
Maharashtra Corona Update : राज्यात आज 982 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.62 टक्क्यांवर
Kranti Redkar : ही लढाई सत्याची, विजय आमचाच होणार; क्रांती रेडकर यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट