Subodh Bhave Birthday : मराठी सिनेसृष्टीतील सुबोध भावेने (Subodh Bhave) ने आज 46 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याच्या आगामी 'फुलराणी' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. आजपर्यंत सुबोध भावेने अनेक दर्जेदार सिनेमांत काम केले आहे. त्यामुळेच त्याच्या या आगामी सिनेमाविषयीदेखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. सुबोध भावेचा 'फुलराणी' सिनेमा पुढल्या वर्षात प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


'फुलराणी' सिनेमात सुबोध भावे पहिल्यांदाच एका आगळ्या-वेगळ्या रोमॅंटिक भूमिकेत दिसून येणार आहे. 2022 मध्ये आधी सिनेमागृहांत आणि नंतर इतर माध्यमांत सिनेमा प्रदर्शित करण्याचा मानस फुलराणीच्या टीमने केला आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले 'फुलराणी' सिनेमाचे मोशन पोस्टर 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' पद्धतीने दाखवण्यात आले आहे. पोस्टरमध्ये सुबोध भावेसोबत एक अभिनेत्री दिसून येत आहे. पण सिनेमात 'फुलराणी'ची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.






मोशन पोस्टर शेअर करत सुबोध भावेने लिहिले आहे,"फुलराणी' या माझ्या नवीन चित्रपटामध्ये आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करत आहे. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या". 


सुबोधने पुढे लिहिले आहे,"कोरोनाचे सर्व नियम पाळून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे खूप समाधान आहे. 2022 मध्ये आधी चित्रपटगृहांत आणि मग बाकी माध्यमांतून 'फुलराणी' प्रदर्शित करायचा मानस निर्मात्यांनी आणि फुलराणीच्या सर्व टीमने केला आहे. फुलराणीचे पहिले मोशन पोस्टर खास तुमच्यासाठी". 


Sooryavanshi Box Office: 'सूर्यवंशी' सिनेमाची 100 कोटींकडे वाटचाल


'फुलराणी' सिनेमाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. तर हर्षवर्धन साबळे, जाई जोशी, अमृता राव या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 'पिग्मॅलिअन' या गाजलेल्या नाट्यकृतीवर आधारित असलेला, 1964 साली प्रदर्शित झालेला 'माय फेअर लेडी' हा म्युझिकल सिनेमा चांगलाच गाजला होता. याच 'पिग्मॅलिअन' कलाकृतीने प्रेरित झालेला 'फुलराणी…अविस्मरणीय प्रेमकहाणी' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Antim Song hone Laga Video:'भाई का बर्थडे' नंतर 'होने लगा' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


Shahrukh Khan : आर्यन-सुहानाचा प्रश्न, आपला धर्म कोणता, हिंदू की मुस्लिम? शाहरूखचं उत्तर...