Ananya Panday-Shahrukh Khan Bonding: ड्रग्ज प्रकरणाची आग अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Panday) घरापर्यंत पोहोचली आहे. आज आम्ही तुम्हाला ड्रगच्या प्रकरणाव्यतिरिक्त किंग खानच्या (Shahrukh Khan) कुटुंबाशी अनन्याचे नातं किती घट्ट आहे हे सांगणार आहे. अभिनेत्री अनन्या पांडे ही शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यांची चांगली मैत्रीण आहे. अनन्या अनेकदा सुहाना आणि आर्यन खानसोबत वेळ घालवताना दिसते. त्याचवेळी, एकदा एका मुलाखतीत अनन्याने असेही सांगितले होते की शाहरुख खान तिच्या वडिलांप्रमाणे आहे.
अनन्याने 2019 मध्ये एका मुलाखतीत म्हटले होते की, 'शाहरुख खान सर माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणीचे (सुहाना) वडील आहेत आणि आम्ही एकत्र आयपीएलचे सामने बघायलाही गेलो आहोत. आम्ही बर्याच विचित्र आणि मजेदार गोष्टी केल्या आहेत आणि त्यांनी आमच्याबरोबर फोटोशूट देखील केले होते. अनन्या पुढे म्हणते, 'शाहरुख सर नेहमी आम्हाला प्रेरणा देत असतात आणि ते जेव्हा आमचे व्हिडिओ शूट करतात तेव्हा आम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्यासारखे वाटते'.
अनन्या पांडेने करण जोहरच्या निर्मितीतील 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनन्याने आतापर्यंत इतर काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यात 'पती पत्नी और वो' आणि 'खाली पीली' इ. दरम्यान, शाहरुख खानच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने ताब्यात घेतले होते, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.
आर्यन खानच्या कोठडीत वाढ, आणखी दहा दिवस तुरुंगात मुक्काम
आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत आणखी वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यन खानसह अन्य सात जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज आर्यनसह इतर आरोपींना सर्व व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. सुनावणीवेळी न्यायालयानं आर्यनची कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आर्यनचा आणखी दहा दिवस मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. 14 दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या आर्यनला आणखी काही दिवस आर्थर रोडमध्ये राहावं लागणार आहे. मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आर्यनच्या वकिलांकडून हायकोर्टात आव्हान दिलं गेलं. यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे.