Ananya Panday : अनन्या पांडेने खरेदी केलं स्वत:चं घर; धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर केला गृहप्रवेश
Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने स्वत:चं घर खरेदी केलं आहे.
Ananya Panday Bought New Luxurious House : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या चर्चेत आहे. चंकी पांडे (Chunky Panday) यांची लेक असलेल्या अनन्याने स्वत:चं घर खरेदी केलं आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
अनन्या पांडेने 2019 मध्ये 'स्टूडेंट ऑफ द इयर 2' (Student of the Year 2) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्रीचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि अल्पावधीतच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता करिअरच्या सुरुवातीलाच तिने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर तिने नव्या घरात प्रवेश केला आहे. तसेच या आलिशान घराची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
View this post on Instagram
अनन्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव
अनन्याच्या नव्या घराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींसह चाहतेदेखील अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. वयाच्या 25 व्या वर्षी अनन्याने स्वत:चं घर घेतल्याने तिचं सर्वांना कौतुक आहे. वडिलांची मदत न घेता स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर तिने हे घर घेतलं आहे. पूजेदरम्यान अनन्याने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
अनन्याने दाखवली नव्या घराची झलक
अनन्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ती नारळ फोडताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"माझं स्वत:चं हक्काचं घर...तुमच्या प्रेमाची आणि सकारात्मक पाठिंब्याची गरज आहे..नवी सुरुवात..धनत्रयोदशीच्या शुभेच्छा". अनन्याच्या या पोस्टवर फराह खानने लिहिलं आहे,"व्हा..अनन्या खूपच लवकर..तुझ्या आनंदात आणखी वाढ होऊ दे". टायगर श्रॉफने लिहिलं आहे,"अनन्या खूप शुभेच्छा", गौरी खानने लिहिलं आहे,"खूप-खूप शुभेच्छा", शिल्पा शेट्टीने लिहिलं आहे,"अनन्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायमच आहे".
अनन्या पांडे नुकतीच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8'मध्ये (Koffee With Karan 8) दिसली होती. या कार्यक्रमाच्या मंचावर तिने करिअर आणि लव्हलाईफबद्दल भाष्य केलं. सध्या ती आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. अनन्याचे 'खो गए हम कहाँ' आणि 'कॉल मी बी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या