मुंबई : बँकांचं कोट्यवधींचं कर्ज बुडवून भारतातून परदेशात पळू गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या (Vijay Mallya) लेकाचं अलिकडे लग्न पार पडलं आहे. विजय मल्ल्याच्या मुलगा अभिनेता सिद्धार्थ मल्ल्याने त्याच्या गर्लफ्रेंड जास्मिनसोबत लग्न केलं आहे. सिद्धार्थ मल्ल्या आणि त्यांची पत्नी जास्मिन यांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोमध्ये दोघेही फार सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. 


अभिनेता सिद्धार्थ मल्ल्याला लग्नाची भेट म्हणून मिळालं 'कामसूत्र'


विजय मल्ल्याच्या मुलगा अभिनेता सिद्धार्थ मल्ल्याने ब्रिटनमधील हर्टफोर्डशायर इस्टेटमध्ये लग्न पार पडलं. ब्रिटनमध्ये कुटुंब मित्रपरिवार आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा पार पडला. सिद्धार्थ आणि जास्मिन यांनी ख्रिश्चन आणि हिंदु अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं असल्याचं फोटोवरुन दिसत आहे.






सिद्धार्थने शेअर केला खास फोटो


अभिनेता आणि मॉडेल सिद्धार्थनेही दोघांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. नुकताच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सिद्धार्थ मल्ल्याने लग्नामध्ये मिळालेल्या एका खास गिफ्टचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोतील गिफ्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा फोटो शेअर करताना सिद्धार्थ मल्ल्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, @tushitapatel माझ्यासाठी लग्नाचं सर्वात खास गिफ्ट दिलं आहेस.


या व्यक्तीने दिलं खास गिफ्ट




विजय मल्ल्याने लेक आणि सुनेसोबत दिली पोज


सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसह सिद्धार्थ आणि जास्मिनच्या लग्नसोहळ्याच सामील झाला होता. विजय मल्ल्याचे सिड आणि त्याची पत्नी जास्मिनसोबत  फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कॅमेऱ्यासमोर पोज देताना कुटुंबातील सदस्य खूपच आनंदी दिसत होते. 


सिद्धार्थ आणि जस्मिन विवाहबंधनात अडकले


जास्मिनच्या आधी अभिनेत्री दीपिका पदुकोणला डेट करणाऱ्या सिद्धार्थ मल्ल्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करून लग्नाची कबूली दिली आहे. त्याने लग्नाचे काही फोटो पोस्ट करत लिहिलं आहे , Mr. and Mrs. Muppet #JustMarried #Wedding. जस्मिनने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरही पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये जास्मिनने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातलेला दिसत होता, तर सिद्धार्थने व्हाईट सूट परिधान केला होता. दोघांचे आऊटडोअर वेडिंग झाल्याचं समोर आलं आहे.