मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांनी लग्न केलं. रजिस्टर मॅरेज केल्यानंतर मुंबईमध्ये दोघांचं रिसेप्शन पार पडलं. सोनाक्षी सिन्हाच्या जिवलग मैत्रिणींपैकी एक हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिनेही सोनाक्षीच्या लग्नानंतरच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत हुमा कुरेशी तिचा बॉयफ्रेंड (Huma Qureshi Boyfriend) रचित सिंह (Rachit Singh) याच्यासोबत पोहोचली होती. या पार्टीतीन अनेक फोटोंमध्ये दोघेही एकत्र दिसत आहेत. आता सोनाक्षीनंतर हुमा कुरेश लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.


सोनाक्षी सिन्हानंतर हुमा कुरेशी करणार लग्न? 


बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला तिचं आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं. हुमा कायमच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. आता मिडिया रिपोर्ट्सनुसार, हुमा कुरेशी ॲक्टिंग कोच रचित सिंह याला डेट करत असल्याची चर्चा आहे. सोनाक्षीच्या लग्नात दोघेही एकत्र दिसल्याने याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आता या रुमर्ड कपलचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दोघेही एकत्र पोज देताना दिसत आहेत. 


करोडपती अभिनेत्यासोबतच्या रिलेशनशिपची चर्चा


सोनाक्षी सिन्हाच्या रिसेप्शन पार्टीतील फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनत्री हुमा कुरेशी आणि रचित सिंहच्या डेटिंगच्या बातम्या वेगाने समोर येत आहेत. सोनाक्षीच्या लग्नाच्या या फोटोंमध्ये रचित सिंहसोबत हुमा कुरेशीला बघितल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरू झाली आहे. रिपोर्टनुसार, सध्या अभिनेत्री रचित सिंहला डेट करत आहे. रचित आणि हुमा अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. अफवा असलेल्या जोडप्याने त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर मौन बाळगलं आहे. अभिनत्री हुमा कुरेशी आणि रचित सिंह या दोघांनीही याबाबत काहीही दुजोरा किंवा अधिकृत माहिती दिलेली नसली तरी आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.


कोण आहे हा रचित सिंह?


रचित सिंह एक प्रसिद्ध ॲक्टिंग कोच म्हणजेच अभिनय प्रशिक्षक आणि अभिनेता आहे. आलिया भट्ट, रणवीर सिंह, वरुण धवन, विकी कौशल, अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांसोबत त्याने ॲक्टिंग कोच म्हणून काम केल्याचं सांगितलं जातं. रचित रवीना टंडनच्या 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिजमध्येही रचित सिंह झळकला असून त्याने वेदांतची भूमिका साकारली होती.


हुमा कुरेशीची डेटिंग लाईफ


हुमा कुरेशीने अनेक वर्षे चित्रपट निर्माता मुदस्सर अजीजला डेट केलं आहे, पण 2022 मध्ये या जोडप्याचा ब्रेकअप झाला. यानंतर सोहेल खान आणि हुमा कुरेशी यांच्या प्रेमप्रकरणाचीही बरीच चर्चा होची. मात्र, दोघांनीही या बातम्यांवर कधीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. याशिवाय, चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि हुमा कुरेशीच्या डेटींगच्या बातम्यांनी बराच काळ चर्चेत होत्या, पण त्याने हुमा चांगली मैत्रीण असल्याचं सांगितलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nana Patekar : शूटींगदरम्यान आगीत गंभीर होरपळले होते नाना पाटेकर, पापण्या आणि दाढीलाही लागली होती आग; 'तो' किस्सा वाचा