एक्स्प्लोर

Anant Ambani Radhika Merchant : मुहूर्त ठरला! अनंत अंबानी-राधिका मर्चेंट 12 जुलैला अडकणार लग्नबंधनात; वेडिंग कार्ड पाहिलंत का?

Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची तारीख आता समोर आली आहे. 12 जुलै 2024 रोजी अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत.

Anant Ambani Radhika Merchant : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. अनंत-राधिका येत्या 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. शाही थाटात मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Centre) हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या दिमाखदार लग्नसोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. वेडिंग कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा लग्नसोहळा 12 जुलै 2024 रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. पारंपारिक हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 12 ते 14 जुलैदरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडले. 

कसा असेल अनंत-राधिकाचा लग्नसोहळा? (Anant Ambani Radhika Merchant Wedding Update) 

अनंत-राधिका यांचा लग्नसोहळा 12 ते 14 जुलैदरम्यान पार पडणार आहे. 12 जुलैला शुभविवाह पार पडेल. 12 जुलैला शुभा आशिर्वाद (Shubh Ashirwad) आणि 14 जुलैला मंगल उत्सव (Mangal Utsav) पार पडणार आहे. 12 जुलैसाठी पारंपारिक ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. तर 13 जुलैला इंडियन फॉर्मल असा ड्रेसकोड आहे. त्यानंतर 14 जुलैला भारतीय पेहराव ठेवण्यात आला आहे. अनंत-राधिकाचं लक्षवेधी वेडिंग कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाही थाटात पार पडतंय दुसरं प्री-वेडिंग

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन 29 मे 2024 पासून करण्यात आलं आहे. लग्झरी क्रूजवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रूझवर पार पडणाऱ्या या प्री-वेडिंगला बॉलिवूडसह जगभरातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. 29 मे ते 1 जूनदरम्यान फ्रान्समध्ये अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग पार पडणार आहे. मनोरंजन, राजकारण, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला आणि लग्नाला हजेरी लावणार आहेत.

संबंधित बातम्या

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या सेकंड प्री-वेडिंगच्या डेस्टिनेशनचा पहिला फोटो समोर; ओरीने दिली इटलीतील अपडेट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kannada Actor Producer Dileep Raj Died: सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?
तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी? PHOTO होतोय व्हायरल
Dhurandhar 2 BO Day 55 Worldwide: रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
CM Vijay Thalapathy Kamal Haasan Support: मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'

व्हिडीओ

Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
 Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्र्यानंतर RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
Embed widget