Topless Woman's Ukraine Protest : सध्या सोशल मीडियावर (Social Media) कान्स फिल्म फेस्टिव्हलची (Cannes Film Festival) चर्चा सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींचे रेड कार्पेट लूक व्हायरल होत आहेत. हॉलिवूड बरोबच बॉलिवूडचे कलाकार देखील या फेस्टिव्हलमध्ये सहगभागी झाले आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर एका महिलेनं नुकत्याच 'स्टॉप रेपिंग अस' अशा घोषणा दिल्या. या महिलेचा लूक पाहून तिथे उपस्थित असणारे अनेक लोक थक्क झाले. 


टिल्डा स्विंटन आणि इद्रिस एल्बा हे 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या नवीन चित्रपट थ्री थाउजंड इयर्स ऑफ लाँगिंगच्या प्रीमियरसाठी पोहोचले. यावेळी युक्रेनमधील ही महिला टॉपलेस अशा लूकमध्ये कान्सच्या रेडक्रार्पेटवर आली. या महिलेनं अंगावर युक्रेनच्या झेंड्याचं  पेंटिंग केलं होतं. यावेळी या महिलेनं असा आरोप की, रशिया आणि युक्रेनच्या युद्धात लाखो महिलांवर बलात्कार होत आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा रेड कार्पेटवर ही महिला 'स्टॉप रेपिंग अस' अशा घोषणा देत होती तेव्हा काही  सिक्युरिटी गार्ड्स तिच्या जवळ आले. त्या गार्ड्सनं त्या महिलेला कव्हर केलं. तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सनं त्या महिलेचे फोटो काढले.  


रशियन सैन्याने ताब्यात घेतलेल्या भागात महिलांच्या बलात्काराची प्रकरणे आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांची प्रकरणे समोर येत आहेत, युक्रेनचे राष्ट्रपती  व्लादिमीर झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं. आता या कान्स रेड कार्पेटवर आलेल्या या युक्रेनच्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये व्लादिमीर झेलेन्स्की यांनी कॉलद्वारे एक खास मेसेज दिला होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी व्लादिमीर झेलेन्स्की यांनी चित्रपट आणि वास्तविकता यांच्यामधील संबंधाबाबत सविस्तर सांगितलं. 'फ्रान्सिस फोर्ड कोपो यांचा 'एपोकॅलिप्स नाउ' आणि चार्ली चॅप्लिन यांच्या 'दरेट डिक्‍टेटर' या चित्रपटांपासून मी प्रेरित झालो आहे.',असं झेलेन्स्की म्हणाले. 


हेही वाचा :