एक्स्प्लोर
महानायक आता 102 वर्षीय वृद्धाच्या भूमिकेत!
मुंबई : 'ओह माय गॉड'फेम दिग्दर्शक उमेश शुक्ला सध्या आपल्या आगामी '102 नॉट आऊट' सिनेमाची तयारी करत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारणार असून, सोबत अभिनेता परेश रावलही असणार आहे.
उमेश शुक्ला यांच्या माहितीनुसार, "यंदा वर्षअखेरपर्यंत या सिनेमाची शूटिंग सुरु होणार आहे आणि पुढल्या वर्षी एप्रिलमध्ये सिनेमा रिलीज करण्याचं प्लॅनिंग आहे. सिनेमाच्या कथा तयार असून, फॅमिली ड्रामा आहे. अमिताभ सरांकडे एक टीव्ही कार्यक्रम असल्याने, त्यामुळे ती शूटिंग पूर्ण झाल्यानंतर '102 नॉट आऊट'ची शूटिंग सुरु करणार आहेत. सिनेमाच्या रिलीजची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. मात्र, पुढल्या वर्षी उन्हाळ्यापर्यंत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे."
या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन हे 102 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणार आहेत. जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती होण्याची इच्छा असणारा असा हा वृद्ध असणार आहे. परेश रावल या वृद्धाच्या म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement