Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) हे ट्वीटच्या माध्यामातून विविध विषयांवर मतं मांडत असतात. नुकतेच अमेय खोपकर यांनी ट्विटरवर दादासाहेब फाळके फिल्मसिटीमधील (Dadasaheb Phalke Chitranagari) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये या फिल्मसिटीच्या रस्त्यावर खड्डे दिसत आहेत. या फोटोला अमेय खोपकर यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


अमेय खोपकर यांचे ट्वीट


अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दादासाहेब फाळके फिल्मसिटीमधील (Dadasaheb Phalke Chitranagari) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रस्त्यावरील खड्डे दिसत आहेत या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,  'मुंबईला मायानगरी म्हणतात ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे 42 आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि 16 स्टुडिओ फ्लोअर्स आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात, पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरुन ये-जा करावी लागते. ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? तुम्ही सुविधाच दिल्या नाहीत म्हणून उद्या हा चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार?' अमेय खोपकर यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.






मराठी चित्रपटांना (Marathi Movie) मिळणारे शो, मराठी कलाकार अशा विविध विषयांवर अमेय खोपकर (Ameya Khopkar) हे भाष्य करत असतात. अमेय खोपकर यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांबाबत देखील ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी बॉलिवूडबरोबरच (Bollywood) इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी जर काम केलं तर चित्रपट निर्मात्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना अमेय खोपकर यांनी दिला होता. मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे.  






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: