Oppenheimer Barbie Box Office Collection : 'ओपनहाइमर' (Oppenheimer) आणि 'बार्बी' (Barbie) या सिनेमांचा भारतीय बॉक्स ऑफिसवर (Box Office) बोलबाला आहे. एकीकडे 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा 100 कोटींच्या दिशेने वाटचाल करत असताना दुसरीकडे 'ओपनहाइमर' आणि 'बार्बी' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर हॉलिवूडचं राज्य असल्याचं दिसत आहे. 


'ओपनहाइमर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Oppenheimer Box Office Collection)


'ओपनहाइमर' (Oppenheimer) हा सिनेमा 21 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी (Opning Day) या सिनेमाने 14.5 कोटी, दुसरा दिवस 17 कोटी आणि तिसरा दिवस 17.25 कोटी आणि चौथ्या दिवशी सात कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 55.75 कोटींची कमाई केली आहे. 


'बार्बी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Barbie Box Office Collection)


'बार्बी' (Barbie) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात पाच कोटींची कमाई केली आहे. 21 जुलै 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दुसऱ्या दिवशी 6.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 7.15 कोटी आणि चौथ्या दिवशी 2.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 21.15 कोटींचा गल्ला जमवला आहे.


जगात 'बार्बी'चं राज्य!


भारतात 'बार्बी'पेक्षा 'ओपनहाइमर' या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. या दोन्ही हॉलिवूड सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाले असून भारतीय सिने-रसिक ख्रिस्तोफर नोलनचा 'ओपनहाइमर' सिनेमा पाहायला सर्वाधिक पसंती दर्शवत आहेत. 'बार्बी' या सिनेमाने जगभरात 2760 कोटींची कमाई केली आहे. तर 'ओपनहाइमर' या सिनेमाने 1430 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे जगात सध्या 'बार्बी'चं राज्य आहे. 


'बार्बी' या सिनेमात मार्गोट रॉबी आणि रयान गोस्लिंग मुख्य भूमिकेत आहेत. तर ग्रेटा गर्विनने (Greta Gerwig) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'बार्बी' या सिनेमात अभिनेत्री मार्गोट रॉबीनं 'बार्बी' ही भूमिका साकारली आहे. तर केन ही भूमिका  रायन गॉस्लिंगनं साकारली आहे. तर दुसरीकडे 'ओपनहाइमर' या सिनेमाचं दिग्दर्शन हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनने (Christopher Nolan) केलं आहे. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.


संबंधित बातम्या


Barbie: पिंक स्पार्कल्स आणि बरंच काही; गूगलवर बार्बी सर्च केल्यानंतर दिसतील 'या' खास गोष्टी