Pushpa 2: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सध्या अल्लू अर्जुन हा 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. अशताच आता 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या  सेटवरील एक फोटो लीक झाला आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या सेटवरील लीक झालेल्या फोटोमधील अल्लू अर्जुनच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


'पुष्पा 2'च्या सेटवरील फोटो झाला लीक 


'पुष्पा 2' चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो लीक झाला आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुन हा 'गंगम्मा तल्ली जतारा' अवतारात दिसत आहे. लीक झालेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


अल्लू अर्जुनच्या लूकनं वेधलं अनेकांचे लक्ष 


'पुष्पा 2' या चित्रपटाच्या सेटवरील लीक झालेल्या फोटोमधील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुन हा निळ्या रंगाची साडी आणि ऑरेंज कलरचा ब्लाऊज अशा लूकमध्ये  खुर्चीवर बसलेला दिसत आहे.  


'गंगम्मा तल्ली जतारा' म्हणजे काय?


'गंगम्मा तल्ली जतारा' तिरुपतीमधील एक प्रसिद्ध विधी आहे जो दरवर्षी आठवडाभर साजरा केला जातो. याच्या शेवटच्या दिवशी, पुरुष स्त्रियांप्रमाणे कपडे घालतात आणि गंगम्मासारखे दिसतात.






कधी रिलीज होणार पुष्पा-2? (Pushpa 2 Release Date)


सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पुष्पा: द रुल' हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित सिक्वेलपैकी एक आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची   'सिंघम अगेन'  या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.


'पुष्पा: द राइज' ला मिळाली प्रेक्षकांची पसंती 


पुष्पा-2 म्हणजेच 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाआधी 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदान्ना ,फहद फासिल आणि अनसूया भारद्वाज यांनी काम केलं. या चित्रपटांमधील गाणी देखील सुपरहिट ठरली. या चित्रपटामधील ओ अंटावा या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता प्रेक्षक 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची प्रतीक्षा अवघ्या दोनशे दिवसांवर; 'सिंगम 3' सुद्धा तेव्हाच टक्कर देणार