OTT Release This Week : कोरोनानंतर घरबसल्या सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. घरबसल्या प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृतींची मेजवानी मिळत आहे. हा विकेंडदेखील तुम्हाला मनोरंजनात्मक घालवायचा असेल तर तुम्हाला अनेक चांगले सिनेमे आणि वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत. यात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) ते प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे.


डंकी (Dunki)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यानंतर त्याचा 'डंकी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'डंकी' हा सिनेमा आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा नंबर वनवर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत होते. 


सालार (Salaar)
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी रिलीज होणार? 16 फेब्रुवारी 2024


दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा आता ओटीटीवर राज्य करण्यास सज्ज आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू, बॉबी सिम्हा, टीनू आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवणारा हा सिनेमा ओटीटीवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


द केरळ स्टोरी (The Kerala Story)
कुठे पाहू शकता? झी 5
कधी रिलीज होणार? 16 फेब्रुवारी 2024


अदा शर्माचा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अदाने लिहिलं आहे,"अखेर बहुचर्चित सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे". 


लव्ह स्टोरियां (Love Storiyaan)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ


करण जौहर (Karan Johar) निर्मित 'लव्ह स्टोरियां' ही वेबसीरिज आहे. सहा भागांची ही सीरिज प्रेक्षक प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. या सीरिजमध्ये पूनम गुरंग, अंकित अरोडा, प्रतीक कोठारी, शरनीता रवी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


रायसिंघानी बनाम रायसिंघानी (Raisinghani Vs Raisinghani)
कुठे पाहू शकता? सोनी लिव्ह


करण वाही आणि जेनिफर विगेंट यांची 'रायसिंघानी बनाम रायसिंघानी' ही कलाकृती सोनी लिव्हवर पाहू शकता. जेनिफरचा एक वेगळा अंदाज या कलाकृतीत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनिरुद्ध राजदेरकरने या कलाकृतीच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


संबंधित बातम्या


Dunki OTT release: अखेर प्रतीक्षा संपली! शाहरुख खानचा डंकी ओटीटीवर रिलीज, कसा आणि कुठे पाहाल सिनेमा?