Varsha Usgaokar On Laxmikant Berde :  मराठी सिनेसृष्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने, कामांनी छाप सोडली. काही अभिनेत्यांनी आपल्या कामाचा ठसा इतका ठळक सोडला की त्यांच्या उल्लेखाशिवाय सिनेसृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. मराठी सिनेसृष्टी सुवर्णकाळानंतर पुन्हा चाचपडत असताना अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant Berde) यांनी पु्न्हा रसिकांना थिएटरमध्ये खेचले. विनोदाची अचूक टायमिंग, सहज अभिनय यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली छाप सोडली आहे. मात्र, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनात एक खंत राहिली असल्याचे अभिनेत्री वर्षा उसगावंकर (Varsha Usgaonkar) यांनी सांगितले. 


वर्षा  उसगावकर यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत  लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. वर्षा उसगावकर यांनी म्हटले की, लक्ष्मीकांतचे अकाली निधन झाले असावे म्हणावे लागेल. लक्ष्मीकांतसोबत 'एक होता विदूषक' हा चित्रपट केला. या चित्रपटात त्याची वेगळी भूमिका होती. लक्ष्या म्हणजे कॉमेडी आणि कॉमेडी म्हणजे लक्ष्या असे समजले जायचे. या बद्दल त्याला खंत होती, त्याला हे चित्र बदलायचे होते.  त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते अशी आठवण वर्षा उसगावकर यांनी सांगितले. 


लक्ष्मीकांतने भूमिकेसाठी केला होता आग्रह... 


डॉ. जब्बार पटेल यांनी लक्ष्मीकांत बेर्डेला हा चित्रपट दिला होता. त्यानंतर त्याने मला फोन करून या चित्रपटात तू हवी आहेस असं सांगितले. हा चित्रपट स्त्रीप्रधान नसल्याने फार मोठी भूमिका नसेल हे त्याने आधीच सांगितले. तरीही त्याने या चित्रपटात काम करण्याचा आग्रह केला. लक्ष्मीकांतचा शब्द, चित्रपटाची कथा आणि माझी भूमिका आवडल्याने मी 'एक होता विदूषक' मध्ये काम केले. 


लक्ष्मीकांतला पुरस्काराची हुलकावणी... 


वर्षा उसगावंकर यांनी मुलाखतीत पुढे सांगितले की, चित्रपटात लक्ष्मीकांतने केलेले काम हे अवॉर्ड विनिंग काम होते.पण, त्याला त्यावर्षी पुरस्कार मिळालं नाही. याचे त्याला वाईट वाटले. या भूमिकेसाठी त्याला पुरस्कार मिळाला असता तर त्याच्या अभिनयातील दुसरी बाजू समोर आली असती आणि त्याला विनोदी अभिनेत्याच्या चौकटीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली असती असे वर्षा उसगावकर यांनी म्हटले.  


 इतर संबंधित बातमी :