Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. वीकेंडला चांगली कमाई केल्यानंतर आता या सिनेमाने रिलीजच्या चार दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.... (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office Collection Day 4)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Opning Day Collection) 11.1 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 16.05 कोटी, तिसऱ्या दिवशी 18.75 कोटी आणि चौथ्या दिवशी 7.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 53.40 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिला दिवस : 11.1 कोटी
दुसरा दिवस : 16.05 कोटी
तिसरा दिवस : 18.75 कोटी
चौथा दिवस : 7.50 कोटी
एकूण कमाई : 53.40 कोटी
आलिया-रणवीरचा ओपनिंग वीकेंडला धमाका
'ओपनहाइमर' (Oppenheimer), 'बार्बी' (Barbie) हे हॉलिवूडपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. दरम्यान 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाचाही बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. अशातच आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचीदेखील चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. वीकेंडला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तसेच 2023 मधला सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा हा पाचवा सिनेमा ठरला आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत. तर धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, आमिर बशीर, तोता रॉय चौधरी, चूर्णी गांगुली, क्षिती जोग आणि अंजली आनंद हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. करण जोहर दिग्दर्शित (Karan Johar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. करणने सात वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे.
पंजाबी मुलगा रॉकी आणि बंगली मुलगी रानी यांची गोष्ट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 178 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमातील गाणी, करण जोहरचं दिग्दर्शन आणि आलिया-रणवीरचा अभिनय अशा सर्वच गोष्टीचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. 28 जुलैला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
संबंधित बातम्या