Kiara Advani Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकताच 31 वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्विमिंग करताना दिसत आहे. 


कियारा आडवाणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमँटिक अंदाजात स्विमिंग करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. 


कियारा आडवाणीने शेअर केला व्हिडीओ (Kiara Advani Shared Video)


कियारा आडवाणीने सोशल मीडियावर शेअर केलेला स्विमिंग करतानाचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थने लाल रंगाचे शॉर्ट्स आणि कियाराने काळ्या-पांढऱ्या रंगाची मोनोकिनी परिधान केलेलं दिसत आहे. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ आणि कियारा समुद्रात उडी मारुन स्विमिंग करताना दिसत आहेत. 






कियाराने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे,"हॅप्पी बर्थडे टू मी... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी तुमची आभारी आहे". कियाराच्या या व्हिडीओवर श्रद्धा कपूर, रकुलप्रीत, शिल्पा शेट्टी, अथिया शेट्टी, मनीष मल्होत्रा, नेहा धूपिपा या सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. तर चाहत्यांनीदेखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


कियारा-सिद्धार्थची लव्हस्टोरी काय आहे? (Kiara Advani Sidharth Malhotra Lovestory)


कियारा आणि सिद्धार्थचा मोठा चाहतावर्ग आहे. 'लस्ट स्टोरीज' या सिनेमाच्या रॅपअप पार्टीदरम्यान कियारा आणि सिद्धार्थ पहिल्यांदा एकमेकांना भेटले. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली. 'शेरशाह' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


कियाराच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kiara Advani Upcoming Project)


कियारा आडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील कार्तिक आर्यन आणि कियाराची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता कियारा 'गेम चेंजर' या सिनेमात राम चरणसोबत स्क्रिन  शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Viral Video : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीने गायले रोमँटिक गाणे, नेटकरी म्हणाले...