Brahmastra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट शुक्रवारी (9 सप्टेंबर) रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मुंबईमध्ये या चित्रपटाचं नुकतच स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. या स्क्रिनिंगला रणबीर आणि आलिया यांनी हजेरी लावली. ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी त्याचे वडील देब मुखर्जी यांच्यासोबत स्क्रिनिंगमध्ये दिसला होता. आलियाची बहिण शाहीन भट्ट ही देखील या स्क्रिनिंगला उपस्थित होती. स्क्रिनिंग दरम्यानचे आलिया आणि रणबीरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी आलिया आणि रणबीरचं कौतुक केलं. 


नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स 


रणणबीर आणि आलिया यांच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे दोघे खूप मेहनत करत आहेत….आशा आहे की हा चित्रपट चांगली कमाई करेल' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ब्रह्मास्त्रच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा'


पाहा व्हिडीओ: 






रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांनी देखील ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये प्रमुक भूमिका साकारली आहे.  हा चित्रपट 410 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.  चित्रपटाच्या रिलीजसाठी अजून चार दिवस बाकी आहेत आणि हे आकडे असेच पुढे गेले, तर अ‍ॅडव्हान्स बुकिंगसोबतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तब्बल 20 कोटींची दमदार ओपनिंग करू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीर यांची जोडी बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Brahmastra Advance Booking : रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिस गाजवणार! रिलीज आधीच ‘आरआरआर’ला टाकले मागे!