Arshdeep Singh : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात भारताचा पराभव झाला. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh)  कॅच सोडल्यामुळे सध्या त्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अयुष्मान खुरानानं (Ayushmann Khurrana) लोकांना अर्शदीपला ट्रोल न करण्याचं आवाहन केलं आहे. आयुष्माननं एक खास व्हिडीओ शेअर करुन हे आवाहन केलं आहे. 


आयुष्माननं शेअर केला व्हिडीओ


आयुष्मान खुरानाने इंस्टाग्रावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आयुष्मान हा ड्रीम गर्ल या चित्रपटातील सहकलाकार अभिनेता मनजोत सिंहसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडीओला आयुष्माननं खास कॅप्शन दिलं आहे. 'मॅच होऊन 24 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. पण कालची रात्र विसरु शकत नाही. जेव्हा भारताची टीम सामना जिंकत नाही तेव्हा खूप वाईट वाटतं. पण या मॅचमधील चांगल्या गोष्टींकडे पाहूयात. कोहली त्याच्या फॉर्ममध्ये आला आहे. सूर्यकुमार यादव देखील चांगला खेळला. आपण सर्वजण आपल्या टीमला सपोर्ट करुयात. अर्शदीपला ट्रोल करणं बंद करा. पुढील सामन्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. ', असं आयुष्माननं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 


पाहा व्हिडीओ






आयुष्मान खुराना सध्या त्याच्या  ड्रीम गर्ल 2 या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आयुष्मानच्या या चित्रपटाचे शूटिंग मथुरा येथील वेगवेगळ्या भागात होत आहे. ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात आयुष्मानसोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Vijay Deverakonda : लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडाचा मोठा निर्णय; मानधनातील सहा कोटी निर्मात्यांना करणार परत!