Alia Bhatt Pregnancy: बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने नुकतीच आपण ‘आई’ होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही गुड न्यूज शेअर केली. सोशल मीडियावर पोस्ट करताच ही बातमी व्हायरल झाली आहे. या बातमीनंतर आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ट्विटरवर ट्रेंड करू लागले होते. सगळे त्यांचे अभिनंदन करू लागले. दरम्यान, एका मीडिया रिपोर्टवर आलियाने संताप व्यक्त केला आहे.


लंडनचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रणबीर कपूर तिला घेण्यासाठी जाणार असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये लिहिलेले पाहून आलिया संतापली. आलियाला तिच्या या आनंदाच्या बातमीचा कामाच्या कमिटमेंटवर परिणाम होऊ द्यायचा नाही, असे या अहवालात सांगण्यात आले. तसेच, जुलैपूर्वी ती तिच्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करणार आहे, असे त्यात नमूद करण्यात आले होते. यावरच आलिया संतापली आहे.


नेमकं काय झालं?


आलियाने अशा बातम्यांना पितृसत्ताक विचारांची परंपरा म्हटले आहे. तिने या बातमीचा एक स्क्रीन शॉट शेअर करत लिहिले की, ‘कशातही उशीर झालेला नाही आणि कोणीही तिला घ्यायला येणार नाहीय. मी एक स्त्री आहे, एखादे पार्सल नाही.’ आलिया तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिते की, 'आम्ही अजूनही काही लोकांच्या मनात राहतो, आम्ही अजूनही पितृसत्ताक जगात जगत आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगते, कोणत्याही कामाला अजून विलंब झालेला नाही. मला कुणीही घ्यायला येण्याची गरज नाही, मी एक स्त्री आहे, पार्सल नाही.'


आलियाने पुढे लिहिले की, 'मला विश्रांतीची अजिबात गरज नाही. पण, तुम्हाला डॉक्टरांचे प्रमाणपत्रही मिळेल हे जाणून बरे झाले. हे 2022 वर्ष आहे. आतातरी या जुन्या विचारातून आपण बाहेर पडू शकतो. मला माफ करा... आता माझा शॉट तयार आहे.' अभिनेत्री आलिया भट्ट सध्या 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोट दिसणार आहे.


चाहत्यांचे मानले आभार! 


याआधी आलियाने रणबीरसोबतचा एक फोटो शेअर करून आनंदाच्या बातमीवर अभिनंदन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी एका फोटो शेअर करत लिहिले की, 'इतके प्रेम मिळाल्याने मी भारावून गेले आहे. प्रत्येकाचे मेसेज वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला एवढेच सांगायचे आहे की, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा. हे सगळं खूप खास आहे. तुम्हा सर्वांचे आभार.'


 


 संबंधित बातम्या


Alia Bhatt Pregnancy : आलिया आणि रणबीरकडून चाहत्यांना गूड-न्यूज; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव


Alia Bhatt Pregnant : आलिया लंडनमध्ये करतेय हॉलिवूडच्या सिनेमाचे शूटिंग; लवकरच परतणार भारतात


Alia Bhatt Pregnancy Reactions : 'एवढ्या लवकर तर...'; आलिया- रणबीरनं 'गूड न्यूज' दिल्यानंतर फॅन्सच्या भन्नाट रिअॅक्शन्स