Alia Bhatt Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आज पुन्हा एकदा आलिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आज सकाळीच आलियाने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. आलिया-रणबीरच्या घरी चिमुकल्या पाहून्याचे आगमन होणार असल्याने चाहतेदेखील आनंदी झाले आहेत. 


आलियाने आज सोशल मीडियावर तिचा आणि रणबीरचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे,"आमचं बाळ लवकरच येत आहे". आलियाने शेअर केलाला रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 






आलिया सध्या लंडनमध्ये असून ती तिच्या आगामी हॉलिवूड सिनेमाचे शूटिंग करत आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) असे या सिनेमाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया लंडनमध्येच आहे. विदेशातील फोटो आणि व्हिडीओ आलिया सोशल मीडियावर शेअर करत असते. रिपोर्टनुसार आलिया लवकरच 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून मुंबईला रवाना होणार आहे. तसेच रणबीर आलियाला घ्यायला लंडनला जाणार असेही म्हटले जात आहे. आलिया-रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


आलिया-रणबीरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री मिळणार प्रेक्षकांना पाहायला


'ब्रह्मास्त्र' या सिनेमाच्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रणबीर कपूर  आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच अमिताभ बच्‍चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकार 'ब्रह्मास्त्र' या सिनेमामध्ये प्रमूख भूमिका साकारणार आहेत. या सिनेमात पहिल्यांदाच प्रेक्षकांना आलिया आणि रणबीरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. 


संबंधित बातम्या