TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


Shabaash Mithu Song Fateh : ‘शाबास मिथू’मधील 'Fateh' गाणं रिलीज; तापसी पन्नूचा खिलाडी अंदाज


बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘शाबास मिथू’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता या सिनेमातील 'फतेह' हे गाणं रिलीज झालं आहे. 


Ekda Kay Zala : 'एकदा काय झालं' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; सुमीत राघवन मुख्य भूमिकेत


‘एकदा काय झालं’ हे वाक्य सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून कोणानाकोणाकडून ऐकतो. अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला ‘एकदा काय झालं’ (Ekda Kay Zala) हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. 


Dharmaveer : आनंद दिघेंच्या नावाने आणि 'धर्मवीर' सिनेमाच्या पडद्याआडून गद्दारांनी सहानभूती मिळवली; संजय सावंत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल


शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरात शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्ते पदाधिकारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आनंद दिघेंच्या नावाने आणि 'धर्मवीर' सिनेमाच्या पडद्याआडून गद्दारांनी सहानभूती मिळवली, असे म्हणत जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) निशाणा साधला आहे. 


Atal Bihari Vajpayee : अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर येतोय सिनेमा; 99 व्या जयंतीला होणार रिलीज


देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव 'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' (Main Rahoon Ya Na Rahoon Yeh Desh Rehna Chahiye - Atal) असे आहे. मंगळवारी निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा करत मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


कतरिना, ईशान अन् सिद्धांत यांच्या 'फोन भूत' ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज


रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटचा आगामी अॅडवेंचर कॉमेडी फोन भूत एका ट्विस्टसह सादर केला जाणार आहे. या चित्रपटात 'फोन भूत' (Phone Bhoot) या सिनेमात कतरिना कैफ (Katrina Kaif),  सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टरदेखील (Ishaan Khatter) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  चित्रपटाचे एक हटके पोस्टर शेअर करून, निर्मात्यांनी या तारखेची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये मुख्य कलाकार दिसत असून हे पोस्टर सध्या चर्चेत आहे.


Viral Song : 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल... ', गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ


सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे. 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल... ओकेमध्ये हाय...', अशी ऑडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. आता यावर एक गाणं बनवण्यात आलं आहे. शहाजीबापू यांच्या व्हायरल कॉलनंतर मिम्सचा सोशल मीडियावर महापूर आला. त्यातच आता या नव्या गाण्यानं सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.


Ananya : जगण्याची नवी दिशा देणाऱ्या 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित; 22 जुलै रोजी चित्रपट होणार रिलीज


एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित 'अनन्या' (Ananya) येत्या 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!', असे म्हणणाऱ्या 'अनन्या'च्या जिद्दीचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून एका क्षणी मन सुन्न करणारा हा ट्रेलर क्षणार्धात मनाला जगण्याची नवी उमेद देणाराही आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून 'अनन्या'ची व्यक्तिरेखा हृता दुर्गुळे (Hruta Durgule) साकारत आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया 'अनन्या'चे निर्माते आहेत. 


Jug Jugg Jeeyo Box Ofice Collection : बॉक्स ऑफिसवर ‘जुग जुग जियो’चा धुमाकूळ; तीन दिवसात कमावले 60 कोटी


Jug Jugg Jeeyo Box Ofice Collection :  जुग जुग जियो (Jug Jug Jeeyo)  हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor), नीतू कपूर (Neetu Kapoor), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांनी प्रमुख भूमिका साकारली. जुग जुग जियो या चित्रपटाचं प्रेक्षक आणि क्रिटिक्स हे दोघेही कौतुक करत आहेत. रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं  9.28 कोटींची कमाई केली. रिलीज झाल्यानंतर तीन दिवसात या चित्रपटानं  60.84 कोटींची कमाई जगभरातील बॉक्स ऑफिसवर केली आहे. 


Vijay Babu Case : लैंगिक अत्याचार प्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक


मल्याळम अभिनेता विजय बाबूला (Vijay Babu) लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. त्याला एर्नाकुलम दक्षिण पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर केले असता त्याला अटक करण्यात आली. 22 जून रोजी केरळ उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. विजय बाबूवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका महिलेने त्याच्यावर चित्रपटातील भूमिकांसाठी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना केरळ हायकोर्टाने त्याला राज्य सोडू नये आणि पासपोर्ट जमा करण्यास सांगितले.


Alia Bhatt Pregnancy : "तुमच्या प्रेमाने आम्ही भारावलो आहोत"... आलियाने मानले चाहत्यांचे आभार


Alia Bhatt and Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) काल (27 जूनला) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गूड-न्यूज दिली होती. त्यामुळे सोशल मीडियावर आलिया-रणबीरच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता आलियाने इंस्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.