Alia Bhatt Pregnancy : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. नुकताच आलियानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं आहे. आलियानं शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव 


आलियानं शेअर केलेल्या फोटोला तिच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं शेअर केलेल्या फोटोला करण जोहर, मौनी रॉय, रकुलप्रीत सिंह, परिणिती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


पाहा फोटो






आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 14 एप्रिल 2022 रोजी  लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडला. आलियानं तिच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लवाली. ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रणबीर कपूर  आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच अमिताभ बच्‍चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकार ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये प्रमूख भूमिका साकारणार आहेत. नीतू कपूर यांनी सांगतिले की रणबीर आलियाच्या लग्नाला 40 आणि रिसेप्शनला 40 पाहूणे उपस्थित होते.  नऊ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना आलिया आणि रणबीरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री बघायला मिळणार आहे.