Alia Bhatt Pregnancy Reactions : अभिनेत्री  आलिया भटनं (Alia Bhatt)  आज (27 जुन) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.  आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. नुकताच आलियानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं. आलियानं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या. तर काहींनी भन्नाट रिअॅक्शन्स दिल्या आहेत. 
 
सध्या aliabhatt आणि ranbirkapoor हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहेत. या हॅशटॅग्सचा वापर करुन आलिया आणि रणबीरनं दिलेल्या गूड न्यूजवर अनेकांनी रिअॅक्शन्स दिल्या आहेत. पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-


ट्विटरवर एका नेटकऱ्यांनी ट्वीट केलं,'रणबीर म्हणाला होता फॅमिली तयार करायची आहे. त्यानं ते करुन दाखवलं'. 






एका युझरनं आलियानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट केली, 'एवढ्या लवकर तर इंडियामध्ये पिझ्झा देखील डिलिव्हर होत नाही. हे कसं झालं?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'कोणी तरी असं म्हणा की, हा जोक आहे. '


आलियानं शेअर केलेल्या फोटोला करण जोहर, मौनी रॉय, रकुलप्रीत सिंह, परिणिती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 14 एप्रिल 2022 रोजी  लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडला. आलियानं तिच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लवाली. ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


हेही वाचा:


 


Alia Bhatt Pregnancy : आलिया आणि रणबीरकडून चाहत्यांना गूड-न्यूज; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव