Alia Bhatt : बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. त्यांच्या व्यावसायिक कामांसह वैयक्तिक आयुष्यासंबंधित प्रत्येक अपडेट चाहते जाणून घेत असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आलिया भट्टची (Alia Bhatt) प्रेग्नंसी. आलिया भट्ट प्रेग्नंट असताना ती कुठे स्पॉट झाली, कोणासोबत घराबाहेर पडली, तिने कसा ड्रेस परिधान केला आहे, ती कोणता डाएट प्लॅन फॉलो करते अशा अनेक गोष्टी चाहते जाणून घेत होते. अशातच आता सुमन अग्रवालने नुकतचं एका पॉडकास्टमध्ये आलियाला राहाच्यावेळी (Raha Kapoor) काय खाण्याचे डोहाळे लागले होते, यावर भाष्य केलं आहे.


राहाच्या वेळी आलियाला काय खाण्याचे डोहाळे लागलेले? 


सेलिब्रिटी डाएट एक्सपर्ट सुमन अग्रवालने नुकतचं एका पॉडकास्ट दरम्यान आलिया भट्टला राहाच्या वेळी काय खाण्याचे डोहाळे लागले होते यावर भाष्य केलं आहे. सुमन अग्रवाल म्हणाली,"राहाव्या वेळी आलियाला मिठाई खाण्याची खूप इच्छा होत असे. कोणतीही महागडी, तुपातली मिठाई खाण्यापेक्षा आलियाला कोलकातातील नोलेन गूळ खाण्याचे डोहाळे लागले होते".


सुमन पुढे म्हणाल्या,"आलिया भट्ट नियमितपणे बंगाली मिठाई खात असे. पण प्रेग्नंसीदरम्यान कोलकातीतील गुळ खाण्यावर तिने भर दिला होता. कोलकातातील गूळ आलियाला प्रचंड आवडतो. त्यामुळे वारंवार ती हा गूळ खात असे. तर करीना कपूरला  (Kareena Kapoor) पराठे आणि वेगवेगळ्या भाज्या खाण्याचे डोहाळे लागले होतेठ. 


आलिया भट्ट आता 'या' सिनेमांत झळकणार (Alia Bhatt Upcoming Movies)


आलिया भट्टचा मोठा चाहतावर्ग आहे. आलियाने सलग सुपरहिट सिनेमे दिले आहेत. सर्वाधिक फिल्म फेअर पुरस्कार तिच्या नावावर आहेत. आलियासाठी 2023 हे वर्ष खूपच कमाल होतं. 'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आता पुन्हा एकदा एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून धमाका करण्यासाठी आलिया सज्ज आहे. 'जिगरा' या सिनेमाच्या माध्यमातून आलिया बॉक्स ऑफिस गाजवणार आहे. 


आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी राहाला जन्म दिला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर 27 जून 2022 रोजी त्यांनी प्रेग्नंसीची घोषणा केली. आलिया-रणबीरच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. रणबीरचा 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आलिया-रणबीरने काही दिवसांपूर्वी राहाची झलक चाहत्यांना दाखवली. तिच्या क्यूटनेसने चाहत्यांना वेड लावलं आहे.


संबंधित बातम्या


Alia Bhatt : यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया भटची धमाकेदार एन्ट्री, 'या' अभिनेत्रीचीही वर्णी