Bollywood Reactions on CAA : केंद्र सरकारकडून 11 मार्च 2024 रोजी भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडकरांनीदेखील (Bollywood Actor) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. यात कंगना रनौत (Kangana Ranaut), थलापती विजय (Thalapathy Vijay), अनुराग कश्यप (Anurag Kashyap), स्वरा भास्कर (Swara Bhaskar), जावेद जाफरी (Jaaved Jaaferi) या सेलिब्रिटींचा समावेश आहे.


कंगना रनौतने केलं CAA कायद्याचं स्वागत (Kangana Ranaut On CAA) 


बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने नागरिकत्व सुधारणा कायद्याचे नियम अधिसूचित केल्यानंतर कंगनाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कंगना सुरुवातीपासूनच CAA कायद्याचं समर्थन करत आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा तिला खूप आनंद झाला आहे. कंगनाने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा एक फोटो शेअर करत तिरंग्याचे पाच इमोजी शेअर केले होते आणि लिहिलं होतं,"CAA".



थलापती विजयचा CAA कायद्याला विरोध


दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने CAA कायद्याला विरोध दर्शवला आहे. थलापती विजयने भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याला बकवास म्हटलं आहे. तसेच तामिळमध्ये हा कायदा लागू करू नये, असंही त्याने म्हटलं आहे.






अनुराप कश्यमने दर्शवला विरोध


भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन 2019 मध्ये वाद निर्माण झाले होते. त्यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपलं मत मांडलं आहे. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या कायद्याला विरोध करत लिहिलं होतं,"जे रस्त्यावर आहेत ते देशद्रोही नाहीत. तर जे सत्तेत आहेत ते देशद्रोही आहेत. लोक आणि संविधानावर देश चालतो. मोदी,शहा नसतानाही देश होताच. बीजेपीचा हा देशद्रोह खपवणार नाही. त्यामुळे देशभक्ति बीजेपीला सिद्ध करायला हवी". 






स्वरा भास्करने उठवलेला आवाज


आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या स्वरा भास्करनेदेखील ट्वीट करत आपला आवाज उठवला होता. 






जावेद जाफरी 


जावेद जाफरी यांनीदेखील ट्वीट करत CAA कायद्याबद्दल आपला विरोध दर्शवला आहे.






संबंधित बातम्या


मोठी बातमी: केंद्र सरकारकडून CAA कायद्याची अधिसूचना जारी, कायदा कधीपासून लागू होणार?