Bade Miyan Chote Miyan Budget: अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar ) आणि अभिनेता टायगर श्रॉफ ( Tiger Shroff ) यांची जबरदस्त केमिस्ट्री असणारा सिनेमा प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. एका अॅक्शन कॉमेडी सेनेमासाठी अक्षय आणि टायगर श्रॉफने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जॅकी भगवानी यांच्या बॅनरखाली बडे मियाँ-छोटे मियाँ (Bade Miyan Chote Miyan) हा सिनेमा बनणार असून अली अब्बास जफर सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. खास बाब म्हणजे या सिनेमाचे बजेट तब्बल 300 कोटी रूपये आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अली अब्बास हे दोन अभिनेत्यांची भूमिका असणारा सिनेमा बनवण्याच्या विचारात आहेत. या सिनेमावरून अली अब्बास खूपच उत्साही आणि आनंदी आहेत. कारण त्यांच्यासाठी ही पहिलीच वेळ आहे की, वेगवेगळ्या दोन जनरेशनमधील दोन अभिनेत्यांना घेऊन हा सिनेमा बनत आहे.
अली अब्बास जफर यांच्या डॅडी या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. अभिनेता शाहिद कपूर या सिनेमात महत्वाची भूमिका साकारत असून या सिनेमाचे चित्रीकरण संपले की लगेच बडे मियाँ-छोटे मियाँ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.
दरम्यान, अक्षय कुमार आणि टागर श्रॉफला पडद्यावर एकत्र कसे आणायचे? यावर अली अब्बास यांचे काम सुरू आहे. बडे मियाँ-छोटे मियाँ सिनेमाच्या 300 कोटी बजेटमधील जास्तीत जास्त रक्कम ही सिनेमा तज्ञांवरच खर्च होणार आहे. अली अब्बास सिनेमासाठी शंभर कोटीच खर्च करणार आहेत. एका सिनेमात दोन अभिनेत्यांची भूमिका असलेले खूप कमी सिनेमे बनवले जातात. परंतु, टायगर श्रॉफ आणि हृतिक रोषण यांची भूमिका असलेल्या वॉर सिनेमाला प्रेषकांनी चांगलीच पसंती दर्शवल्यामुळे अब्बास यांनी दोन अभिनेत्यांना एकत्र घेऊन सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nafisa Ali Tests Positive : अभिनेत्री नफिसा अलीला कोरोनाची लागण, गोव्यातील रुग्णालयात दाखल
- Allu Arjun Upcoming Movies : अल्लू अर्जुनचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित, 'पुष्पा'चा दुसरा भाग वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला
- Bade Miyan Chote Miyan Budget : अक्षय कुमार-टायगर श्रॉफ बनणार बडे मियाँ-छोटे मियाँ, सिनेमाचे बजेट करेल हैराण
- Madhur Bhandarkar : दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावरून दिली माहिती