Allu Arjun Movies List : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत 306 कोटींची कमाई केली आहे. सिनेमात अल्लूने ट्रक ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. 


'83', आणि 'स्पायडरमॅन' या सिनेमांनादेखील 'पुष्पा' सिनेमाने मागे टाकले. अल्लू अर्जुनचे येत्या काही दिवसांत अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. लवकरच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 17 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्लूचा आगामी 'आयकॉन' (Icon) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन वेणू श्रीराम करणार आहेत. या सिनेमात पूजा हेगडे आणि कृती शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 


बहुचर्चित केजीएफ (KGF) सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या आगामी सिनेमातदेखील अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अॅक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे. 
तसेच तमिळ चित्रपटांचे दिग्दर्शक ए.आर. मुरुगादास यांच्या आगामी चित्रपटातदेखील अल्लू दिसणार आहे.






पुष्पा आता ओटीटीवर
'पुष्पा' सिनेमा आता प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' सिनेमा प्रदर्शित झाला आहे.  7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर लवकरच हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Madhur Bhandarkar : दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावरून दिली माहिती


Bade Miyan Chote Miyan Budget : अक्षय कुमार-टायगर श्रॉफ बनणार बडे मियाँ-छोटे मियाँ, सिनेमाचे  बजेट करेल हैराण


Mithila Palkar : 'वेब सीरिज क्विन' मिथिला पालकरला कोरोनाची लागण


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha